भारत सरकारतर्फे ‘आरोग्य सेतु’ अॅप सादर : ट्रॅकिंग व अलर्ट्सची सोय!

इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयामार्फत आरोग्य सेतु (Aarogya Setu) नावाचं एक अॅप सादर करण्यात आलं असून यामुळे करोना/कोरोना/COVID-19 चा प्रसार कमी करता येऊ शकतो असं म्हटलं आहे! या अॅपद्वारे आपण करोना ग्रस्त रुग्ण ट्रॅक तर करू शकतोच शिवाय तशी व्यक्ती इतर कोणाच्या संपर्कात आली आहे ते सुद्धा पाहता येईल! हे अॅप सध्या चाचणी आवृत्तीत उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

आरोग्य सेतु अॅपची जाहिरात मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून त्यामुळे हे अॅप डाउनलोड करण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे. काही दिवसातच हे अॅप तब्बल ७.५ कोटी लोकांनी डाउनलोड केलं आहे! इलेक्ट्रिॉनिक्स व आयटी राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी ही माहिती जाहीर केली आहे. 

Download Aarogya Setu on Google Play : play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu
Download Aarogya Setu on App Store : apps.apple.com/in/app/aarogyasetu/id1505825357

अपडेट : कोरोना कवच अॅप काढल्यानंतर त्याच्या सारख्याच सुविधा असलेलं आरोग्य सेतु अॅप आता आणण्यात आलं आहे त्यानुसार लेख अपडेट करत आहोत याची नोंद घ्या
अपडेट : कोरोना कवच अॅप प्ले स्टोअरवरुन काही अज्ञात कारणांमुळे काढून टाकण्यात आलं आहे!

Download Corona Kavach from Google Play : https://play.google.com/store/apps/details?id=com.cosafe.android

हे अॅप GPS ट्रॅकिंगचा वापर करून करोना झालेली व्यक्तीने भेट दिलेली जागा, ठिकाणे यांच्या परिसरात आपण गेल्यास आपल्याला तसा अलर्ट देईल. यामध्ये रंग दिसतील उदा. हिरवा रंग दिसला तर काळजीचं काही कारण नाही. तपकिरी (brown) दिसला तर डॉक्टरना भेटा, पिवळा म्हणजे लगेच क्वारंटाईन स्थितीमध्ये जायला हवं (थोडक्यात घरीच बसायला हवं) आणि लाल म्हणजे तुम्हाला COVID-19 चा प्रादुर्भाव झालेला आहे.

अॅपला गरजेपेक्षा अधिकच परवानगी द्यावी लागत असल्याची अनेकांची तक्रार आहे. या परमिशन्सचा हे अॅप नेमकं कशासाठी वापर करत आहे हेसुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं नाही. वरील सोयीशिवाय करोनाबद्दल फारशी माहितीही अॅपमध्ये देण्यात आलेली नाही. SARS-CoV-2 म्हणजे कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेल्यांची माहिती एव्हढाच उद्देश सध्यातरी या अॅपद्वारे दिसत आहे.

तूर्तास अधिक माहितीसाठी तुम्ही जिओ, एयरटेल, मायक्रोसॉफ्ट, गूगल यांच्या तर्फे उघडण्यात आलेल्या वेबसाइट्सवर जाऊ शकता.

Exit mobile version