व्हिडिओ कॉन्फरन्स अॅप्सचे ६.२ कोटी डाउनलोड्स : यूजर्समध्ये ७०% वाढ!

व्हिडिओ कॉन्फरन्स अॅप्स सध्याच्या करोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन स्थितीत अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी ठरत आहेत. यामध्ये स्काइप, ,मायक्रोसॉफ्ट टीम्स, गूगल हॅंगआउट्स, हॅंगआउट्स मीट, झुम, डिस्कॉर्ड, हाऊस पार्टी इ. अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी सध्या स्काइप, झुम, हॅंगआउट्स चर्चेत आहेत. झुमने अचानक या काळात मोठी झेप घेत इतरांकडून यूजर्स मोठ्या संख्येने आपल्याकडे वळवले आहेत! १४ मार्च ते २१ मार्च दरम्यान या व्हिडिओ कॉन्फरन्स अॅप्सचे तब्बल ६.२ कोटी डाउनलोड्स झाले आहेत!

कोरोना/COVID-19 मुळे सध्या बऱ्यापैकी सर्वच लोक घरी आहेत. काही जणांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याची परवानगी/सक्ती करण्यात आली आहे. अशावेळी व्हिडिओ कॉन्फरन्स/व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांशी संपर्क साधून काम करणं, गप्पा मारणं सहजसोपं होऊन जातं. अनेक व्यवसाय त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे सध्या काम करून घेत आहेत. यामुळेच अशा अॅप्स/सॉफ्टवेअर/ऑनलाइन पर्यायांच्या वापरात अनेक पटींनी वाढ पाहायला मिळत आहे.

Skype : गेली अनेक वर्षं व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी सर्वात लोकप्रिय असलेली सेवा म्हणजे Skype (स्काइप). स्काइपच्या अॅक्टिव यूजर्समध्ये ७० टक्क्यांनी वाढ झाली असून आता जवळपास ४.४ कोटी लोक स्काइप वापरत आहेत! स्काइप ते स्काइप कॉल्सच्या मिनिटांची संख्या सुद्धा तब्बल २२० टक्क्यानी वाढली असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने दिली आहे! त्यांच्याच Microsoft Teams या बिझनेस सेवेचे सुद्धा ४.४ कोटी यूजर्स झाले असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. २१ एप्रिल पासून त्यांच्या Office 365 सेवेचं नाव Microsoft 365 असं असणार आहे.
Download Skype : skype.com

ZOOM : या गेल्या काही दिवसांच्या काळात मोठी प्रगती केलेली कंपनी म्हणजे Zoom Video Communications. या अॅपचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहे की यांनी आता गूगल प्ले स्टोअरवर टिकटॉक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम यांनाही मागे टाकलं आहे! या अॅपचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सला एकाचवेळी १०० जण सहभागी होऊ शकतात! तेसुद्धा मोफत बेसिक प्लॅनमध्ये. झुम कंपनीची ही वाढ पाहून अॅडवीकने झुम म्हणजे करोना क्वारटाईन अर्थव्यवस्थेचा राजा म्हटलं आहे! अधिकअधिक लोक घरून काम करत असताना रिमोट वर्किंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी झुमला प्राधान्य दिलं जात आहे. सध्या हे भारतात सर्वाधिक डाउनलोड केलं जात असलेलं अॅप आहे!
Download Zoom : https://zoom.us/

WhatsApp : व्हॉट्सअॅपच्या अॅक्टिव यूजर्समध्येही ४० टक्क्यानी वाढ झाली असून व्हिडिओ कॉल्स, चॅट मेसेजेस, स्टेट्स असं सर्वच गोष्टींचं प्रमाण वाढलं आहे! अर्थात हे तर होणारच होतं. मात्र प्रमाण इतक वाढलं आहे की भारतात नेटवर्क लोड कमी व्हावा म्हणून व्हॉट्सअॅपने स्टेट्ससाठी ३० सेकंदाची मर्यादा आता १५ सेकंदावर आणली आहे!

Download Links for Video Conferencing/Calling Apps

Exit mobile version