फेसबुकचं गेमिंग अॅप सादर : आता गेम्ससाठी ट्विच, यूट्यूबसोबत स्पर्धा?

Facebook Gaming App

फेसबुकने अलीकडे गेमिंग क्षेत्राकडेही आपला मोर्चा वळवला असल्याचं दिसत आहे. गेल्या काही महिन्यात वाढलेलं गेमिंगचं प्रमाण पाहून इथेही आपला हिस्सा असावा असं फेसबुकला वाटणारच. काल त्यांनी या दृष्टीने पाऊल टाकत स्वतंत्र गेमिंग अॅप Facebook Gaming उपलब्ध केलं असून याद्वारे युजर्स त्यांचे गेमप्ले स्ट्रीम/अपलोड करू शकतात किंवा इतरांनी अपलोड केलेले गेमप्ले पाहू शकतात. हे अॅप सादर केल्याने फेसबुक गेमिंगसाठी आता थेट अॅमेझॉनची ट्विच (Twitch), यूट्यूब गेमिंग आणि मायक्रोसॉफ्ट मिक्सर (Mixer) यांच्याशी स्पर्धा करेल.

Download Facebook Gaming on Google Play : play.google.com/store/apps/details?id=com.facebook.games

हे अॅप काही देशात आधीच चाचणीसाठी उपलब्ध होतं तर आता ते जगभर सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे. नव्या अॅपमधील Go Live पर्याय वापरुन यूजर्स लगेच लाईव्ह स्ट्रीम सुरू करू शकतील. यामुळे बाहेरून कोणतं अॅप घेण्याची गरज उरणार नाही. यूट्यूब गेमिंग अॅपसुद्धा याप्रकारेच काम करायचं मात्र कमी प्रतिसादामुळे यूट्यूबने ते अॅप आता बंद केलं आहे.

तूर्तास या अॅपमध्ये जाहिराती नसतील. शिवाय गेमर्सना त्यांच्या व्हिडिओद्वारे पैसे मिळवण्याचे मार्गही मर्यादित आहेत. भविष्यात आम्ही यावर आणखी पर्याय आणण्याच्या विचारात आहोत असं फेसबुकतर्फे सांगितलं आहे. हे अॅप आता अँड्रॉइडवर उपलब्ध असून iOS काही कालावधीत येईल.

गेम ब्रॉडकास्टिंग मध्ये सध्या ट्विच आघाडीवर असून त्यांना गाठणं यूट्यूबलाही अजून तरी शक्य झालं नाहीय. यूट्यूबवर गेम स्ट्रीमिंग सध्या स्थिर आहे म्हणावयास हरकत नाही. शिवाय अल्प प्रमाणात युजर्स मायक्रोसॉफ्टच्या मिक्सरकडेही आहेत. त्यात आता फेसबुकला किती स्थान मिळेल सांगता येणं कठीण आहे.

Search Terms : Facebook Gaming App launched on Google Play

Exit mobile version