फेसबुक मेसेंजर रूम्स सादर : एकाचवेळी पन्नास जणांचा व्हिडिओ कॉल!

काल फेसबुकने त्यांच्या सर्व सेवांमध्ये नव्या सोयींचा समावेश केला असून ‘रूम्स’ तयार करण्याची सोय यामध्ये प्रमुख आहे. लॉकडाउन सुरु असताना व्हिडीओ कॉल्सचा वाढलेला वापर पाहून कंपन्या आता त्यांच्या सेवा व्हिडीओ कॉल्सना समोर ठेऊन बदलत आहेत. झूमची लोकप्रियता पाहून गॅलरी सारख डिझाईन असलेले व्हिडीओ कॉल्स सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत. आतापर्यंत फेसबुकची व्हिडीओ कॉलिंग सेवा उपलब्ध होती मात्र मर्यादा होत्या आणि शिवाय यासाठी फेसबुक अकाउंट असणं गरजेचं होतं. मात्र काल झालेल्या बदलांनुसार आता नव्या मेसेंजर रूम्स जॉईन करण्यासाठी फेसबुक अकाउंट नसलं तरी चालेल!

Messenger या सेवेमधील Rooms नावाची सुविधा वापरुन आपण एकावेळी ५० जणांचा ग्रुप व्हिडिओ चॅट तयार करू शकता. यासाठी दिलेली लिंक वापरुन इतर लोकही जॉइन होऊ शकतील तेही फेसबुक अकाऊंट शिवाय. फक्त त्या लिंकवर क्लिक करून झुम अॅप प्रमाणेच जॉइन व्हायचं आहे.

जर तुम्ही या रूम्समध्ये मेसेंजर अॅपद्वारे जोडले गेला तर तुम्ही AR इफेक्टस आणि बॅकग्राउंड्स वापरू शकता! फेसबुक ग्रुपमधून तयार केलेल्या रूम्समध्ये ग्रुपचे सदस्य सहभागी होऊ शकतात. ही सोय आता काही देशात उपलब्ध करून देण्यात आली असून टप्प्या टप्प्याने सगळीकडे देण्यात येईल.

रूम्स होस्ट करण्याची सोय लवकरच इंस्टाग्रामवरही येणार आहे!

WhatsApp Group Calls : काही दिवसांपूर्वी आम्ही दिलेल्या माहीती प्रमाणे व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलच्या ग्रुपची मर्यादा ४ वरून आता ८ करण्यात आली आहे

New Live Video Features for Facebook, Instagram and Portal : Live With ची सोय परत आणण्यात आली असून यामुळे आणखी एका व्यक्तीसोबत तुम्ही फेसबुकवर लाईव्ह करू शकाल! ऑनलाइन इवेंट्स आता ऑनलाईन ओन्ली असे मार्क करता येतील. लाईव्ह व्हिडीओसाठी पैसे घेण्याचीही सोय देण्यात येणार असून यामुळे जो व्यक्ती लाईव्ह करत असेल तो त्याच्या viewers कडून त्याच्या कन्टेन्टसाठी पैसे आकारू शकतो! यामुळे अनेक शिक्षक किंवा ऑनलाईन व्हिडीओ क्रिएअर्सना उत्पन्न मिळवता येईल! संस्थांसाठी निधी उभारण्यासाठी डोनेट बटन सुद्धा जोडू शकता

इंस्टाग्रामच्या डेस्कटॉप वेबसाईटवरूनही आता लाईव्ह व्हिडीओ पाहता येतील आणि त्यावर कमेंट्ससुद्धा करता येतील!

Messenger Kids ही लहान मुलांसाठीची मेसेजिंग सेवा आता सर्वत्र उपलब्ध होत आहे . याद्वारे पालकांना त्यांच्या मुलांच्या व्हिडीओ कॉल्सवर नियंत्रण ठेवता येईल.

फेसबुक डेटिंगमध्ये आता Virtual Dates तयार करता येतील! यामुळे लोक एकमेकांना व्हर्च्युअल डेट्सवर इनव्हाईट करू शकतील!

Exit mobile version