व्हॉट्सअॅपवर लवकरच ८ जणांचा ग्रुप कॉल करता येणार!

व्हॉट्सअॅप या प्रसिद्ध मेसेजिंग अॅपवरून आपण लवकरच ८ जणांचा ग्रुप कॉल करू शकणार आहात. या सुविधेची सध्या चाचणी सुरू असून येत्या काही दिवसात नवी मर्यादा सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल. सध्या व्हॉट्सअॅपवर एकावेळी ४ जणांचाच ग्रुप कॉल करता येतो. झुम, गूगल मीट, ड्युओ, स्काईप, मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या अॅप्सनी वाढवलेल्या मर्यादेमुळे आता व्हॉट्सअॅपही त्यांची मर्यादा ४ वरून ८ वर नेणार आहे. ही नवी मर्यादा व्हॉईस व व्हिडीओ दोन्ही प्रकारच्या कॉल्ससाठी लागू असेल.

सध्या ही मर्यादा व्हॉट्सअॅपच्या Beta आवृत्तीमध्ये सुरू करण्यात आली असून योग्य चाचणी पूर्ण झाल्यावर येत्या काही दिवसातच सर्वांना अपडेटद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. इतर अॅपसोबतच्या स्पर्धेमुळे शक्यतो लवकरात लवकर आणण्याच्या प्रयत्नात आहे असं दिसत आहे.

लॉक डाऊन दरम्यान व्हिडिओ कॉलिंग अॅप्सचं प्रमाण अनेक पटींनी वाढलं असून अलीकडेच गूगल ड्युओनेही त्यांची ग्रुप कॉलची मर्यादा वाढवून १२ वर नेली आहे. आता WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपच्या Android Beta 2.20.132 आणि iOS 2.20.50.25 व्हर्जन्समध्ये नवा बदल पाहण्यास मिळतोय.

गेले कित्येक महीने केवळ ४ जणांचाच ग्रुप कॉल देण्याऱ्या व्हॉट्सअॅपलाही आता मर्यादेत बदल करावा लागलेला पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की सध्या किती मोठ्या प्रमाणात व्हिडीओ कॉलिंग वाढलं आहे… काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने ग्रुपमधूनच ग्रुप कॉलिंग सुरू करण्याची सोय दिली होती. आता नव्या मर्यादेमुळे ग्रुप कॉल्स आणखी सोपे होणार आहेत.

नवी मर्यादा सर्वांना उपलब्ध करून देण्यात आल्यावर हा लेख अपडेट करण्यात येईलच…

Search Terms : WhatsApp is rolling out the new limit of participants (upto 8 people) for group calls!

Exit mobile version