मायक्रोसॉफ्ट Surface Go 2, Surface Book 3 सादर : सोबत सर्फेस हेडफोन्ससुद्धा!

मायक्रोसॉफ्टने सध्याची परिस्थिती लक्षात घेत कोणताही कार्यक्रम न घेता त्यांची सर्फेस उत्पादने काल जाहीर केली असून यामध्ये लॅपटॉप, टॅब्लेट्स, इयरबड्स, हेडफोन्सचा समावेश आहे. Surface Go 2 हा टॅब्लेट आता थोड्या मोठ्या स्क्रिनसह आणखी पॉवरफुल प्रोसेसरसह मिळेल. यामध्ये जवळपास १० तासांची बॅटरी लाईफ असेल. Surface Book 3 हा मायक्रोसॉफ्टचा नवा लॅपटॉप इंटेलच्या 10th Gen प्रोसेसरसह मिळेल. मॅकबुक प्रो सोबत थेट स्पर्धा असलेला हा लॅपटॉप टॅब्लेट म्हणून सुद्धा वापरता येतो हे विशेष!

Surface Go 2 मध्ये 10.5″ स्क्रीन, 4GB रॅम, 64GB स्टोरेज, 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये टचस्क्रीन असून सर्फेस पेन सपोर्टसुद्धा आहे. याची किंमत $399 (~₹३०५००) इतकी आहे.

Surface Book 3 साठी 13.5″/15″ पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये 8GB/16GB/32GB रॅम पर्याय आहेत तर स्टोरेजसाठी 256GB/512GB/1TB/2TB असे पर्याय आहेत. NVIDIA GeForce GTX 1660 Ti ग्राफिक्स कार्ड देण्यात आलं आहे. याची किंमत $1599 (~₹१,२१,५००) आहे.

सोबत Surface Headphones 2, Surface Earbuds व Dock 2 सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत असून नव्या हेडफोन्सची बॅटरी लाईफ, आवाज सुधारण्यात आला आहे शिवाय यामध्ये आता Office 365 जोडण्यात आलं असून पॉवरपॉइंट, वर्डमध्येही याद्वारे सहज वापर करता येईल!हेडफोन्सची किंमत $249 तर इयरबडसची किंमत $199 इतकी आहे.

Exit mobile version