फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सुरू : ऑफर्ससह मोठी सूट!

Galaxy A80 या सेलमध्ये २१९९९ रुपयात मिळणार!

Flipkart Big Saving Days

फ्लिपकार्टने बऱ्याच दिवसांनी आपला मोठा सेल जाहीर केला असून आज रात्रीपासून म्हणजे २३ जूनपासून २७ जूनपर्यंत हा बिग सेव्हिंग डेज सेल सुरू असेल. फोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप, कॅमेरा, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अशा जवळपास सर्व प्रकारच्या वस्तूंवर विविध ऑफर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. HDFC बँक डेबिट व क्रेडिट कार्ड धारकांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल. फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांसाठी हा सेल आज (२२ जून) ८ वाजताच सुरू होईल.

बिग सेव्हिंग डेज सेल सर्व ऑफर्ससाठी लिंक : https://bit.ly/FlipOffersJune

यामध्ये प्रमुख ऑफर म्हणता येईल ती म्हणजे सॅमसंगच्या एक वर्ष जुन्या Galaxy A80 वर मिळणारी मोठी सूट. या फोनची सध्या किंमत ४१९९९ असून या सेलदरम्यान हा फोन चक्क २० हजारांनी कमी म्हणजे २१९९९ रुपयात मिळणार आहे! या फोनचा कॅमेरा पूर्णपणे फिरतो यामुळे बॅक कॅमेराच फ्रंट कॅमेरा म्हणून वापरता येतो! अर्थात हा फोन स्टॉक क्लियरन्स अंतर्गत स्वस्त किंमतीत दिला जात आहे पण तरीही हे नक्कीच चांगलं डील म्हणता येईल.
Galaxy A80 ऑफर लिंक : http://fkrt.it/zmbZH4uuuN

काही दिवसांपूर्वीच आलेल्या Galaxy A21s वर १००० रुपये सूट मिळेल. हा फोन १९९९९ ऐवजी १८९९९ किंमतीत मिळेल! Galaxy S10 Lite वर सुद्धा १००० रुपये सूट मिळेल. सोबत गूगलचा Pixel 3a २९९९९, अॅपलचे iPhone XS ५८९९९, iPhone 7 २८४९९, iPhone 7 Plus ३४९९९ या किंमतीत उपलब्ध होत आहेत.

वरील पर्याय चीनी फोन्स नको असलेल्या ग्राहकांना उत्तम पर्याय आहेत. चीनी फोन्सवरही बऱ्याच ऑफर्स असून Oppo A9 2020 १२९९०, realme X १५९९९, Redmi K20 Pro २३४९९, Vivo Nex २३९९०, Moto Razr १२४९९९ अशा किंमतीत मिळेल मात्र ही फोन सध्याचं वातावरण पाहता घ्यावे की नाही हा निर्णय वाचकांना घ्यायचा आहे.

बऱ्याच वस्तूंवर नो कॉस्ट EMI, एक्स्चेंज ऑफर्ससुद्धा उपलब्ध आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस बंद असलेल्या ऑनलाइन शॉपिंगमध्ये आता या सेलद्वारे ग्राहकांना प्रथमच ऑफर्सद्वारे उत्पादने उपलब्ध होत आहेत. ऑनलाइन विरुद्ध ऑफलाइन वाद सुरू असल्यामुळे याआधी असायच्या तेव्हढया प्रमाणात ऑफर्स यापुढे दिसतील असं वाटत नाही. शिवाय फोन्सवरील GST सुद्धा वाढवण्यात आल्यामुळे अनेक फोन्सच्या किंमतीत बदल झाले आहेत तर येत्या काही दिवसात आणखी किंमती वाढतील असंही सांगितलं जात आहे!

Exit mobile version