MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

फ्लिपकार्ट प्लस सादर : मोफत डिलिव्हरी, सेलमध्ये प्राधान्य मिळणार

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
August 15, 2018
in eCommerce

फ्लिपकार्टतर्फे आज  ‘फ्लिपकार्ट प्लस’ मेंबरशिप प्रोग्रॅम सादर करण्यात आला असून या अंतर्गत फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना मोफत फास्ट डिलिव्हरी, फ्लॅश सेल वेळी प्राधान्य, कस्टमर सपोर्टमध्ये अग्रक्रम तसेच फूड, ट्रॅव्हल साईट्सवरील कूपन्स यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. अॅमॅझॉनच्या प्राइम मेंबरशीपला मिळणारा  वाढता प्रतिसाद पाहता ‘फ्लिपकार्ट प्लस’द्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा फ्लिपकार्टचा प्रयत्न असेल.

आपण केलेल्या प्रत्येक ऑर्डरवर (रिटर्न/कॅन्सल केलेल्या सोडून) फ्लिपकार्टतर्फे अकाउंटवर कॉईन्स (Coins) देण्यात येतील. आपण केलेल्या खरेदीच्या प्रत्येक २५० रुपयांसाठी आपणास १ कॉइन मिळेल आणि एका खरेदीवर आपण जास्तीत जास्त १० कॉईन्स अकाउंटवर मिळवू शकता. यासाठी कमीतकमी २५० ची खरेदी करणे आवश्यक असणार आहे. समजा तुम्ही ७५० ची खरेदी केली तर तुमच्या अकाउंट वर ३ कॉईन्स जमा होतील. तसेच एका ऑर्डरवर जास्तीत जास्त १० कॉईन्सचे बंधन असल्याने  आपण ८००० ची खरेदी केली तरीसुद्धा आपणास १० कॉईन्स मिळतील.

अधिकृत माहिती : Flipkart Plus Know More

अशाप्रकारे आपल्या अकाउंट वर ५० कॉईन्स जमा झाल्यानंतर त्या कॉइन्सचा वापर करून आपण ‘फ्लिपकार्ट प्लस’ मेंबर होऊ शकतो. ही मेंबरशिप एका वर्षासाठी वैध असेल. हे कॉईन्स डायरेक्ट विकत घेण्यासाठी कोणतीही सोय नाही. आणि ही सदस्यता केवळ या कॉइन्सद्वारेच मिळेल!

‘फ्लिपकार्ट प्लस’चे सदस्य झाल्यानंतर आपणास मोफत आणि फास्ट डिलिव्हरी मिळेल. बिग बिलियन डे सारख्या सेल वेळेस फ्लिपकार्ट प्लसच्या सदस्यांना इतर ग्राहकांआधी खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त बुक माय शो, मेक माय ट्रीप, झोमॅटो, CCD, ixigo यांचे व्हाउचरसुद्धा मिळतील. यासोबतच आणखी ५० कॉईन्स वापरून  हॉटस्टार (Hotstar) चे वार्षिक सबस्क्रिपशन सुद्धा घेता येणार आहे.

अॅमॅझॉन प्राइम मेंबरशिपच्या वार्षिक ९९९ फीच्या तुलनेत फ्लिपकार्टवर यासाठी पैसे आकारले
जात नसले तरी ग्राहकांना ५० कॉईन्ससाठी जास्त खरेदी करावीच लागणार आहे. थोडक्यात ५ वेळा २५०० पेक्षा जास्त किंवा ५० कॉईन्स होईपर्यंतची खरेदी आलीच! त्यामुळे ही सेवा केवळ म्हणायला मोफत असणार आहे!

फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांसाठी ऑफर्स : https://www.flipkart.com/vip/rewards
अधिकृत व्हिडिओ : Flipkart Plus – More for you always

अॅमॅझॉन प्राइम मेंबरशिप मध्ये ग्राहकांना फ्री डिलिव्हरी सोबतच, अॅमॅझॉन प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक यासारखे सर्व्हिस सुद्धा उपलब्ध आहेतच. काही दिवसांपूर्वीच अॅमॅझॉनने १२९ च्या मासिक प्लॅनद्वारे प्राइम मेंबरशिप उपलब्ध करून दिली आहे.

search terms : flipkart plus membership loyalty program launched how to register

ADVERTISEMENT
Tags: FlipkartHow ToOnlineShopping
Share16TweetSend
Previous Post

जिओ गिगाफायबर ब्रॉडब्रॅंड, जिओफोन २, गिगाटीव्ही नोंदणी १५ ऑगस्टपासून

Next Post

डिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार !

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
Next Post
डिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार !

डिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!