गूगल ड्युओवर लिंकद्वारे व्हिडिओ कॉलमध्ये कसं invite करायचं?

मार्च महिन्यापासून कोरोनामुळे व्हिडिओ कॉलिंगचं अचानक खूप जास्त प्रमाणात वापरलं जाणं अजूनही कमी झालेलं नाही. व्हिडिओ कॉलिंगचे यूजर्स आपल्याकडे खेचण्याची झुम, मायक्रोसॉफ्ट टीम्स/स्काईप, गूगल मीट/ड्युओ, मेसेंजर, व्हॉट्सअॅप यांची स्पर्धा अजूनही सुरू आहेच… आता गूगलच्या ड्युओ या अॅपमध्ये तुम्ही झुमप्रमाणे लिंक शेयर करून इतरांना व्हिडिओ कॉलमध्ये invite करू शकता!

मात्र यासाठी invite करून बोलावलेल्या सर्वांकडे गूगल अकाऊंट असणं गरजेचं आहे. अन्यथा त्या लिंक्स काम करणार नाहीत. गूगल ड्युओने अलीकडे बऱ्याच नव्या सोयी जोडल्या असून नव्या इमोजी, फॅमिली मोड आणि ड्युओ कॉल्स आता डेस्कटॉप वेबसाइटवरही करता येतील. शिवाय वाढवलेली ग्रुप मर्यादा जी आता एकावेळी १२ जणांसोबत ग्रुप व्हिडिओ कॉलची सुविधा देते!

गूगल ड्युओवर लिंकद्वारे कसं invite करायच?

  1. Google Duo अॅप उघडा
  2. थोडसं खाली स्क्रोल केलं की Create Group पर्याय दिसेल.
  3. इथे एक ग्रुप तयार करा ज्यासाठी तुम्हाला किमान एक सदस्य कॉन्टॅक्ट्समधून निवडावा लागेल.
  4. आता Done केलं की खाली तुम्हाला लिंक तयार झालेली दिसेल ही लिंक तुम्ही कॉपी करून तुम्हाला जिथे invite करायच आहे तिथे शेयर करू शकता!

यापूर्वी गूगल ड्युओवर ग्रुप कॉलसाठी सर्व सदस्यांचा फोन क्रमांक किंवा ईमेलची गरज पडायची मात्र आता लिंक शेयरिंगमुळे कॉलिंग आता आणखी सोपं झालं आहे! गूगल ड्युओ फोन्ससाठी सर्वोत्तम गुणवत्ता पुरवणारं अॅप आहे असं आमचं आमच्या अनुभवानुसार मत आहे.

Download Google Duo : https://duo.google.com/

Search Terms : Google Duo now allows adding members with invite links

Exit mobile version