इंस्टाग्राम Reels आता भारतात उपलब्ध : टिकटॉकसाठी नवा पर्याय!

इंस्टाग्रामने काही देशात आधीच उपलब्ध असलेली Reels (रील्स) नावाची सोय आता भारतात उपलब्ध करून दिली असून याद्वारे टिकटॉकप्रमाणेच १५ सेकंदाचे शॉर्ट व्हिडिओ तयार करून पोस्ट करता येतात! टिकटॉक बॅन झाल्यावर Mitron, Roposo, Chingari, Moj असे काही भारतीय पर्याय सध्या लोकप्रिय होत आहेत. अशावेळी आधीच अनेकांच्या फोनमध्ये असलेल्या इंस्टाग्राममध्ये हा पर्याय येत असल्याने अनेक जण तिकडे वळण्याची जास्त शक्यता आहे.

रील्स यापूर्वी ब्राजील, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये उपलब्ध होतं. हे टिकटॉकप्रमाणे स्वतंत्र ॲप नसून इंस्टाग्राममध्येच जोडण्यात आलेलं फीचर आहे. १५ सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून एडिट करता येतो. एडिटिंगसाठी काही टूल्स असून एडिट करून त्याला उपलब्ध गाणी जोडून पोस्ट करू शकता.

इंस्टाग्रामचे प्रॉडक्ट हेड विशाल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इंस्टाग्रामद्वारे लोकांना क्रिएटिविटी दाखवण्यासाठी आता एक जागतिक मंच मिळणार आहे. सध्या उपलब्ध पर्यायांमध्ये शॉर्ट व्हिडिओसाठी पर्याय नव्हता म्हणून आता हा नव्याने जोडण्यात येत आहे. क्रिएटर्सना हा नक्की आवडेल.’

Instagram Reels चा वापर कसा करायचा ?

तुम्हाला आधी तुमचं इंस्टाग्राम ॲप अपडेट करून घ्यावं लागेल यासाठी प्ले स्टोअर/ॲप स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करून घ्या. आधीच्या बूमरँग आणि सुपरझुमच्या सोबत स्टोरीज विभागात आता नवा Reels चा पर्याय आलेला दिसेल. याद्वारे १५ सेकंदाचा व्हिडिओ तयार करून स्टोरीजमध्ये शेयर करू शकाल. Explore टॅबमध्येही शेयर करता येईल.

फेसबुकने या पूर्वीसुद्धा अनेक वेळा असा प्रयत्न केला असून काही दिवसांपूर्वीच आधी आणण्यात आलेलं Lasso ॲप आता बंद करण्यात आलं आहे. यावेळी किती प्रतिसाद मिळेल ते समजेलच…

यासोबट इंस्टाग्राममध्ये आणखी एक बदल पाहण्यात येतोय तो म्हणजे कमेंट पिन करण्याची सोय यामुळे तुमच्या पोस्ट केलेल्या फोटोवरील तुम्हाला आवडलेली कमेंट तुम्ही पिनकरून सर्वात वरती ठेऊ शकता!

Exit mobile version