सॅमसंगचा Galaxy Z Fold 2 जाहीर : घडी घालून वापरण्यासाठी अधिक मोठे डिस्प्ले

सॅमसंगने आज त्यांचा नवा Galaxy Z Fold 2 सादर केला असून या फोनची घडी घालता येते आणि घडी उलगडताच याचा 7.6″ डिस्प्ले असलेला टॅब्लेट बनतो! घडी घातल्यावर दिसणारा डिस्प्ले आता अधिक मोठा करण्यात आला असून तो आता 6.2″ असेल ज्याला Infinity-O cover screen म्हणण्यात आलं आहे!

Samsung Galaxy Z Fold 2

यामधील तंत्रज्ञान सुद्धा आता पूर्ण नव्याने करण्यात आलं असून आता बेझल्स (डिस्प्लेच्या कडा) सुद्धा बऱ्याच कमी करण्यात आल्या आहेत! गॅलक्सी अनपॅक्ड २०२० मध्ये या फोनची Galaxy Note 20 सोबत घोषणा करण्यात आली आहे.

यामधील उघडल्यावर दिसणारा मोठा डिस्प्ले Dynamic AMOLED 2X असून 120 Hz रिफ्रेश रेट आहे. हा फोन mystic black आणि mystic bronze या दोन रंगात उपलब्ध होईल. यामध्ये एकावेळी आपण तीन अॅप्स वापरू शकतो! उदा. यूट्यूब, व्हॉट्सअॅप व ब्राऊजर असे कोणतेही तीन अॅप्स एकाचवेळी!

डिस्प्ले : 7.6 inches Resolution 1768 x 2208 pixels (~372 ppi density) HDR10+ 120Hz refresh rate
Cover display: 6.23″, Super AMOLED, 816 x 2260 pixels (25:9)
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865+
GPU : Adreno 650
रॅम : 12GB LPDDR4x
स्टोरेज : 256GB UFS 3.1
कॅमेरा : 12MP Triple Camera + 12MP Ultrawide + 12MP Telephoto lens
फ्रंट कॅमेरा : 10MP
बॅटरी : 4500mAh 25W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10, One UI 2.1
सेन्सर्स : Fingerprint (side-mounted), accelerometer, gyro, proximity, compass, barometer
रंग : Mystic Bronze, Mystic Black
किंमत :

Exit mobile version