Xbox Series S : आता आला आहे स्वस्त एक्सबॉक्स गेमिंग कॉन्सोल!

Xbox Series S Gaming Console

एक्सबॉक्सचा हा नवा कॉन्सोल इंटरनेटवर लिक व्हायला सुरू झाल्यानंतर लगेचच त्यांनी स्वतः याबद्दल माहिती ट्विट करत एक व्हिडिओसुद्धा प्रकाशित केला आहे. नवा Series S कॉन्सोल आजवरचा सर्वात लहान एक्सबॉक्स असणार आहे! एक्सबॉक्स हा मायक्रोसॉफ्टचा गेमिंग कॉन्सोल असून याला आपण टीव्हीला जोडून विविध गेम्स ऑनलाइन वा ऑफलाइन स्वरूपात खेळू शकता.

नव्या कॉन्सोलची किंमत सुद्धा सध्याच्या कॉन्सोल्स मानाने कमी म्हणता येईल अशी $299 (~२२०००) ठेवण्यात आली आहे. या किंमतीबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून एक्सबॉक्सच्या चाहत्यांनी याचं चांगलच स्वागत केलेलं दिसून येत आहे. याची किंमत कमी असण्याचं कारण म्हणजे यामध्ये डिस्क ड्राइव्ह देण्यात आलेला नाही याचा अर्थ तुम्हाला यामध्ये गेम्स खेळायच्या असतील तर इंटरनेटवर डाउनलोड करणे हाच पर्याय आहे. शिवाय Xbox Series X च्या तुलनेत याची GPU क्षमता आणि कमी रेजोल्यूशन आउटपुट आहे.

नेहमीच्या Xbox Series X ची किंमत $499 आहे तर नव्या Xbox Series S ची किंमत $299 असणार आहे. हे दोन्ही कॉन्सोल १० नोव्हेंबरला सादर होतील असं सांगण्यात येत आहे. त्यावेळी याबद्दल अधिक माहिती समजू शकेल. खाली फीचर्सची उपलब्ध माहिती दिलेली आहे.

Exit mobile version