Gmail चा नवा लोगो : G Suite चं नवं नाव आहे Google Workspace!

गूगलने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या G Suite या सेवेचं नवं नाव आता गूगल वर्कस्पेस (Google Workspace) असं असणार आहे. यामधील जवळपास सर्व ऑफिस ॲप्सचा लोगो बदलून नव्याने डिझाईन करण्यात आला आहे. उदा. Gmail, Docs, Meet, Sheets आणि कॅलेंडर यांमध्ये नवे बदल करण्यात आले आहेत. या सेवा एकमेकांशी जोडलेल्या असून त्यांचा एकत्रित वापर करता येतो हे अधोरेखित करण्याच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे.

गूगल वर्कस्पेस उपलब्ध करून देत असतानाच्या याच्या किंमती सुद्धा कमी करण्यात आल्या आहेत. आता Business Starter पॅक ₹१२५ दरमहा, Business Standard पॅक ६७२ दरमहा आणि Business Plus पॅकची ₹१२६० दरमहा अशी असणार आहे. या सर्व प्लॅन्समध्ये Gmail, Drive, Meet, Calendar, Chat, Docs, Sheets, Slides, Keep, Sites, Forms, Currents या सेवा मिळतील.

Google Workspace : https://workspace.google.com/

नव्या गूगल वर्कस्पेसबाबत माहिती देणारा व्हिडिओ : https://youtu.be/bE31y5HbukA

New Gmail Logo 2020

यामध्ये प्रमुख जाणवेल असा बदल म्हणजे जीमेल (Gmail) या लोकप्रिय ईमेल सेवेचा नवा लोगो. इतकी वर्षं खऱ्या पत्राच्या लिफाफ्याप्रमाणे असलेला हा लोगो आता गूगलच्या लोगोमधील रंग घेऊन तयार करण्यात आलेल्या M प्रमाणे दिसेल. यामुळे हा नवा लोगो Google Maps, Google Photos, Chrome यांच्या डिझाईन प्रमाणे दिसेल. इतर आयकॉन्सचा फार कोणी विचार करणार नाही मात्र जीमेलच्या लोगो बदलाबाबत आरडाओरड होणार हे नक्की!

Search Terms : Google rebrands G Suite as Google Workspace alongwith new logos for Gmail, Drive, Calendar

Exit mobile version