इंस्टाग्रामचं अपडेट : आता मेसेंजिंगमध्ये सेल्फी स्टीकर्ससह अनेक नवे पर्याय!

InstagramUpdate

फेसबुकने काही महिन्यांपूर्वी जाहीर केल्यानुसार मेसेंजर आणि इंस्टाग्राममधील डायरेक्ट मेसेजेस एकत्र आणण्यास सुरुवात केली आहे. आज भारतात ही सोय उपलब्ध झाली असून आता इंस्टाग्राम यूजर्स इंस्टाग्राममधूनच फेसबुक मेसेंजरवर मेसेज करू शकतील आणि मेसेंजरवरून इंस्टाग्रामवरील यूजर्सनाही मेसेजेस (DMs) करता येतील! हे अपडेट आजपासून अनेकांना उपलब्ध झालं असून याबद्दल ट्विटरवर ट्रेंडद्वारे बरीच चर्चा, मीम्स पहायला मिळत आहेत!

मेसेजिंगसोबत इतर बदल जसे की चॅटचा रंग बदलणे, कोणत्याही इमोजीने react करता येणे, रिप्लाय देण्यासाठी स्वाईप करणे, सेल्फी स्टीकर्स करणे, इ. गोष्टी करता येतील!

हे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं इंस्टाग्राम ॲप प्ले स्टोअर (164.0.0.46.123) किंवा ॲप स्टोअर (165.0) मधून अपडेट करून घ्या. तसेच जर मेसेंजरमधुन मेसेज करायचा असेल तर ते ॲपसुद्धा अपडेट करा.

जर तुम्हाला ही सोय नको असेल तर तुम्ही ती बंदसुद्धा करू शकता. याबद्दल अधिक माहितीसाठी लिंक Cross-App Communication for Instagram and Messenger

Search Terms : Instagram Updates, Introducing New Messaging Features for Instagram

Exit mobile version