Instagram Lite ॲप भारतात उपलब्ध : केवळ 2MB साईज सोबत मराठी सपोर्ट!

काही महिन्यांपूर्वी बंद केलेलं इंस्टाग्रामचं ॲप फेसबुकने काल पुन्हा सादर केलं असून Instagram Lite आता नव्या रूपात आणखी सुविधांसह पुन्हा उपलब्ध झालं आहे. अधिक फोन्सवर युजर्सना इंस्टाग्रामचा अनुभव घेता यावा हा उद्देश आहे. याची साईझ केवळ 2MB असणार आहे! यामुळे हे ॲप स्वस्त फोन्सवरसुद्धा सहज चालू शकेल! Facebook Fuel for India कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली.

या ॲपमध्ये तुम्ही फोटो, व्हिडीओ अपलोड करू शकाल. स्टोरीज पाहू शकाल अपलोड करू शकाल. हे ॲप मराठीसह ९ भारतीय भाषांमध्ये (मराठी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तामिळ व तेलगू) वापरता येईल!

मात्र यामध्ये काही गोष्टी नेहमीच्या ॲपप्रमाणे करता येणार नाहीत जसे IGTV, शॉपिंगचे पर्याय, Reels यामध्ये दिसणार नाहीत. रील्सचा पर्याय युजर्स आणि इंस्टाग्राम दोघांना फायद्याचा ठरला असता मात्र सध्यातरी तो उपलब्ध नाही.

दुसऱ्या शब्दात तुम्हाला जर रील्स, IGTV ची कटकट नको असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता!

लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.instagram.lite

यासोबत Born on Instagram 2.0 नावाचा क्रिएटर्ससाठी असलेला प्रोग्राम आता भारतात आणण्यात आला आहे. यामुळे क्रिएटर्सना त्यांचे फोटो व्हिडिओ सर्वांसमोर सादर करता येतील. boireels.splashthat.com या लिंकवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकाल.

Exit mobile version