व्हॉट्सॲप पेमेंट्स आता उपलब्ध : UPI मार्फत व्हॉट्सॲपवरूनच पाठवा पैसे!

अनेक दिवस चाचणी सुरू असलेली व्हॉट्सॲपची पेमेंट सुविधा भारतात आता सुरू झाली आहे. फेसबुककडे मालकी असलेल्या व्हॉट्सॲपला बराच काळ UPI कडून भारतात यासाठी परवानगी मिळत नव्हती. मात्र आता SBI, ICICI, AXIS व HDFC बँकसोबत भागीदारी करत त्यांनी ही सोय आणली आहे.

व्हॉट्सॲप भारतात लोकप्रिय मेसेजिंग सेवा असून त्यांच्या डिजिटल पेमेंट सेवेमुळे अनेकांना नवा पर्याय उपलब्ध होत आहे. गूगल पे, फोनपे, पेटीएम सारख्या ॲप्सना आणखी एक पर्याय आला आहे. सध्यातरी त्यांच्या प्रमाणे ऑफर्स, कुपन्स व्हॉट्सॲपवर दिसत नाहीत. मात्र मेसेज करत करत पैसे पाठवण्याची सोय अनेकांना आवडू शकेल. त्यासाठी स्वतंत्र ॲपमध्ये जाण्याची गरज नाही.

State Bank of India, ICICI Bank, HDFC Bank and Axis Bank यांच्या सोबत भागीदारीत एक सुरक्षित आणि सोपा डिजिटल पेमेंट पर्याय भारतात आणत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे.या निमित्ताने अनेकांना डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याची संधी आम्हाला मिळाली आहे असं व्हॉट्सॲप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस यांनी सांगितलं.

आमच्या फोनमध्ये डार्क मोड सुरू असल्यामुळे रंग वेगळा दिसत आहे. तुमच्या फोनमध्ये काही पर्याय वेगळे असू शकतात.
  1. प्रथम ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या चॅटवर जा.
  2. आता आपण नेहमी फोटो पाठवत असताना जे अटॅच बटन (📎) टच करतो त्यावर स्पर्श करा.
  3. आता तुम्हाला कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, डॉक्युमेंट, लोकेशन, कॉनटॅक्ट सोबत नवा Payment पर्याय आलेला दिसेल. (जर दिसत नसेल तर व्हॉट्सॲप प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्या)
  4. त्यावर क्लिक करून ACCEPT AND CONTINUE वर स्पर्श करा.
  5. आता तुमची बँक निवडा.
  6. आता तुमचं बँक अकाऊंट आणि क्रमांक तपासण्यासाठी Verification SMS येईल. ही प्रक्रिया आपोआप पूर्ण होईल.
  7. हे तुम्हाला तुम्ही पैसे पाठवत असणाऱ्या व्यक्तीला एकदाच करावं लागेल. हा सेटप तुम्ही दोघांनी केला असेल तरच ही सोय वापरता येईल.
  8. जर समोरच्या व्यक्तीने सेटप केला नसेल तर Notify पर्याय दिसेल त्याद्वारे त्यांना सेटप करण्यास सांगू शकता.
  9. आता तुम्ही Send Payment पर्याय वापरुन फोनपे गूगल पे प्रमाणेच रक्कम टाकून UPI पिन टाइप करून पैसे पाठवू शकता .
  10. याद्वारे केलेले व्यवहार मेसेजेसमध्ये व एका यादीद्वारेही पाहू शकाल.

Search Terms : How to use whatsapp payments, how to send money from whatsapp what is whatsapp payments

Exit mobile version