एयरटेलकडून 5G ची यशस्वी चाचणी : भारतातली पहिली कंपनी!

Airtel 5G India

भारती एयरटेलने २८ जानेवारी रोजी हैदराबादमध्ये त्यांच्या 5G नेटवर्कची यशस्वी चाचणी घेऊन ते आता 5G Ready Network असल्याचं जाहीर केलं आहे. या चाचणीमुळे एयरटेल भारतातली पहिली 5G रेडी कंपनी बनली आहे. 5G सेवांमुळे अवघ्या काही सेकंदात पूर्ण चित्रपट डाउनलोड करता येईल इतक्या वेगात इंटरनेट आपल्या फोन्सवर उपलब्ध होणार आहे. चाचणी पूर्ण झाली असली तरीही सरकारकडून स्पेक्ट्रम वाटप झाल्यावर परवानगी मिळवून मगच प्रत्यक्षात 5G आपणा सर्वांना उपलब्ध होणार आहे.

या चाचणीसाठी त्यांनी सध्याचाच 1800MHz बॅंड वापरला. डायनॅमिक स्पेक्ट्रम शेयरिंग वापरुन 5G व 4G एकाच स्पेक्ट्रम ब्लॉकमध्ये वापरुन ही चाचणी घेण्यात आली आणि याद्वारे दहापट अधिक वेग मिळाला असं एयरटेलने सांगितलं आहे!

एयरटेलने दिलेल्या माहितीनुसार त्यांचं सर्व नेटवर्क आता 5G साठी तयार असून परवानगी मिळाल्यावर अवघ्या काही महिन्यात सर्वत्र 5G सेवा पुरवू शकू असा त्यांना विश्वास आहे!

https://twitter.com/airtelindia/status/1354682540322250756

नव्या जनरेशन वेळी जाहिराती केलेला स्पीड आपल्याला नंतर निम्मासुद्धा राहत नाही हे वास्तव असलं तरी 5G द्वारे आता पुरेसा वेग सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल. एयरटेलच्या चाचणीनंतर आता असं सांगता येऊ शकतं की २०२१ मध्ये भारतात 5G सेवा सुरू होऊ शकेल. रिलायन्स जिओनेही त्यादृष्टीने माहिती जाहीर केली आहे.

Exit mobile version