सॅमसंगचे Galaxy A52, Galaxy A72 भारतात सादर : 90Hz डिस्प्लेसह!

सॅमसंगच्या प्रसिद्ध Galaxy A मालिकेतील दोन नवे स्मार्टफोन्स आज भारतात सादर झाले आहेत. Galaxy A52 व Galaxy A72 काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी लॉंच झाला होता. इतर देशात A72 5G सपोर्ट सह सादर झाला आहे मात्र भारतात याला 5G सपोर्ट नसेल. या फोन्समध्ये OIS म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देण्यात आलं आहे. सोबत मोठी बॅटरी आणि IP67 सर्टिफिकेशन आहे ज्यामुळे हे फोन्स 1 मीटर पाण्यात 30 मिनिटे चालू राहू शकतील असं सॅमसंगने सांगितलं आहे!

Galaxy A52 मध्ये 6.5″ sAMOLED 90Hz डिस्प्ले, Snapdragon 720G प्रोसेसर, 64MP+12MP+5MP+5MP असा कॅमेरा सेटप, 32MP फ्रंट कॅमेरा, 4500mAh बॅटरी आणि 25W चार्जिंग सपोर्ट मिळेल. याची किंमत २६४९९ (6GB+128GB) आणि २७९९९ (8GB+128GB) अशी असणार आहे.

Galaxy A72 मध्ये 6.7″ sAMOLED 90Hz डिस्प्ले, Snapdragon 720G प्रोसेसर, 64MP+12MP+8MP+5MP असा कॅमेरा सेटप, 32MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 25W चार्जिंग सपोर्ट मिळेल. याची किंमत ३४९९९ (8GB+128GB) आणि ३७९९९ (8GB+256GB) अशी असणार आहे.

https://youtu.be/963JhlnPpBk
Exit mobile version