DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

ड्रोन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी DJI चा कमी वजनाचा नवा ड्रोन DJI Air 2S सादर झाला आहे. यामध्ये आता आधीच्या तुलनेत मोठा 1″ 20MP सेन्सर देण्यात आला आहे ज्यामुळे व्हिडिओ व फोटोची गुणवत्ता अधिक चांगली असणार आहे. शिवाय यामध्ये आता 5.6K रेजोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करता येणार आहे.

याचं वजन ६०० ग्रॅम्स पेक्षा कमी असून यामध्ये विविध ऑटोनोमस फंक्शन्सचा समावेश आहे. हा ड्रोन 12KM अंतरावरून FHD लाईव्ह व्हिडिओ दाखवू शकतो. 5.6K at 30fps आणि 4K at 60fps अशा रेजोल्यूशनमध्ये याचा कॅमेरा व्हिडिओ काढू शकेल जे या आकाराच्या ड्रोनसाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे. यामध्ये चार दिशांनी आलेला अडथळा ओळखता येईल आणि त्यानुसार ड्रोन आपोआप त्याची दिशा बदलेल.

व्हिडिओ शूट करत असताना 8x पर्यंत झुम करता येणार आहे. MasterShot नावाच्या सुविधेद्वारे आपण सेट केलेल्या मार्गावर सेट केलेली कृती करत व्हिडिओ शूट करता येईल.

या ड्रोनची किंमत $999 म्हणजे जवळपास ७५००० रुपये असणार आहे. DJI ने अलीकडे बरेच कमी वजनाचे ड्रोन्स आणले असून आता यासाठी स्वतःचेच अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Exit mobile version