यूट्यूब Shorts व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्सना पैसे देणार!

YouTube Shorts

गेल्या वर्षी यूट्यूबने टिकटॉकला पर्याय म्हणून आणलेली शॉर्ट्स व्हिडिओ सेवा प्रसिद्ध होण्यासाठी यूट्यूब कंपनी बरेच प्रयत्न करत आहे. शॉर्ट्स व्हिडिओना ट्रेंडिंगमध्येही स्थान दिलं जात आहे. शॉर्ट्समध्ये तुम्ही ६० सेकंदांचे उभे व्हिडिओ तयार करून त्यांना गाणी, फिल्टर्स यांची जोड देऊन अपलोड करू शकता. हे व्हिडिओ नेहमीच्या यूट्यूब व्हिडिओसोबतच उपलब्ध होतील. शिवाय यांना अधिकाधिक लोकांनी पाहावं यासाठी यूट्यूब त्या व्हिडिओना प्रसिद्धी देतं.

आता खास शॉर्ट्स व्हिडिओ करणाऱ्या क्रिएटर्सना गूगल कंपनी स्वतः वेगळे पैसे देणार आहे. यासाठी गूगलने तब्बल 100 मिलियन डॉलर्सचा फंड तयार केला आहे ज्याद्वारे २०२१-२२ मध्ये यूट्यूब पार्टनर प्रोग्राम अंतर्गत जास्त गाजणारे व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्सना रिवार्ड्स देण्यात येणार आहेत. अमेरिका आणि भारत या दोन देशांतील क्रिएटर्ससाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

टिकटॉकवर बरेच जण मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले होते मात्र थेट टिकटॉककडून पैसे कमवण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता. इंस्टाग्रामवरही Reels च्या माध्यमातून छोटे व्हिडिओ टाकता येतात. ते सुद्धा अलीकडे बरेच प्रसिद्ध झाले आहेत मात्र तेथेही Monetization उपलब्ध नाहीच. याबाबत यूट्यूबने मात्र पुढाकार घेत नेहमीच्या यूट्यूब व्हिडिओप्रमाणे यासाठी सुद्धा Monetization सुरू केलं आहे. शिवाय आता खास क्रिएटर्सना त्यांच्या गाजलेल्या शॉर्ट्स व्हिडिओबद्दल गूगलकडून थेट बक्षीस देण्यात येईल.

त्यांनी केलेल्या ब्लॉग पोस्टनुसार दर महिन्याला जास्तीतजास्त पाहिले जाणारे व्हिडिओ बनवणाऱ्या हजारो क्रिएटर्सना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कृत करण्यात येईल.

अधिक माहिती : https://blog.youtube/news-and-events/introducing-youtube-shorts-fund

यूट्यूब शॉर्ट्समध्ये नव्या सोयी :

यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना त्याच्या टायटलमध्ये #Shorts असेल आणि तो उभा व्हिडिओ असेल तर शॉर्ट्स अंतर्गत ग्राह्य धरला जाईल. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहू शकता.

Exit mobile version