रियलमीचा लॅपटॉप भारतात सादर : realme Book मध्ये आहे 2K डिस्प्ले!

realme Book Slim

रियलमीने भारतातील स्मार्टफोन्स मार्केट गाजवल्यानंतर आता लॅपटॉप क्षेत्रात प्रवेश करत नवा realme Book लॅपटॉप सादर केला आहे. यामध्ये 3:2 aspect ratio असलेला 2K रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले, 11th Gen इंटेल प्रोसेसर मिळेल.

realme Book Slim चं वजन 1.38 किलो असेल. यामधील डिस्प्ले १४ इंची 2K(2160×1440-pixel) IPS आहे. यावर 100% sRGB color gamut, Gorilla Glass protection, 90% screen-to-body ratio अशा सोयी मिळतील. 11th-Gen Intel Core i5-1135G7 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये integrated Iris Xe graphics मिळेल. dedicated graphics देण्यात आलेलं नाही. 8GB रॅम आणि 512GB पर्यंत SSD स्टोरेज देण्यात आलं आहे.

PC Connect नावाच्या अॅपद्वारे त्यांनी रियलमी फोन्स आणि लॅपटॉपमध्ये डेटा शेयर करणं सोपं केलं आहे. यामुळे फोनची स्क्रीन लॅपटॉपवर पाहता येईल. फाइल्स सुद्धा ड्रॅग अँड ड्रॉप करता येतील.

या लॅपटॉपमध्ये 54Wh बॅटरी असून 65W फास्ट चार्जर देण्यात आला आहे. यामुळे हा लॅपटॉप ३० मिनिटात ५०% चार्ज होतो. याची बॅटरी लाईफ ११ तासांची आहे. यामध्ये 2xUSB C पोर्ट (Thunderbolt 4 Support) , 1xUSB A 3.1 Gen 1 पोर्ट, ड्युयल Harman ऑडिओ स्पीकर्स आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. याचा किबोर्ड बॅकलिट आहे.

या लॅपटॉपची किंमत ४६,९९९ पासून सुरू होते. या मॉडेलमध्ये Intel i3, 8GB रॅम आणि 256GB SSD मिळेल. दुसऱ्या मॉडेलमध्ये Intel i5, 8GB रॅम आणि 512GB SSD मिळेल. याची किंमत ५९९९९ अशी आहे. सध्या लॉंच ऑफरमुळे यांची किंमत अनुक्रमे ४४९९९ आणि ५६९९९ अशी असेल आणि हे लॅपटॉप ३० ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट व रियलमीच्या वेबसाइट आणि स्टोर्समध्ये मिळतील

Mi ने लॅपटॉप सादर केल्यानंतर आता त्यालासुद्धा रियलमीने पर्याय आणला आहे. आता स्वस्त चीनी लॅपटॉप्सचे पर्याय नेहमीच्या पर्यायासोबत उपलब्ध होताना दिसत आहेत.

Exit mobile version