अँड्रॉइड 12 उपलब्ध होण्यास सुरुवात : जाणून घ्या काय आहे नवीन?

अँड्रॉइड या प्रसिद्ध मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमची नवी आवृत्ती आज सादर झालेल्या Google Pixel 6 सोबत उपलब्ध होण्यास सुरूवात झाली आहे. नव्या आवृत्तीचं नाव Android 12 असं असणार आहे. यामध्ये नवं Material You डिझाईन, Responisve Motion, Dynamic Color, नवीन विजेट्स, नवीन रंग पर्याय, अधिक सुरक्षा, माइक आणि कॅमेरा इंडिकेटर्स, प्रायव्हसी डॅशबोर्ड, स्क्रोलिंग स्क्रीनशॉट, गेम डाउनलोड होत असतानाच गेमप्ले सुरू करता येणं अशा गोष्टी पाहायला मिळतील.

काही गूगल ॲप्समध्ये नवीन डिझाईन देण्यास सुरुवात झाली आहे उदा. Google Clock

खालील फोन्सना Android 12 अपडेट दिलं जाईल असं त्या त्या कंपन्यांनी जाहीर केलं आहे किंवा पूर्वी फोन्स लॉंच करताना तसं आश्वासन दिलं आहे. प्रत्यक्षात अपडेट उपलब्ध होण्यास बराच वेळ लागू शकतो! यादी व्यतिरिक्त अन्य फोन्सना सुद्धा अपडेट दिलं जाऊ शकतं कृपया तुमच्या फोन कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन त्याची माहिती घ्या. नेहमी प्रमाणे गूगल पिक्सल फोन्समध्ये नवं अँड्रॉइड व्हर्जन सर्वात आधी उपलब्ध झालेलं आहे.

Search Term : Whats New in Android 12

Exit mobile version