गूगल Pixel 6 आणि Pixel 6 Pro सादर : उत्तम फोटोग्राफीसह नवं अँड्रॉइड!

गूगलचे नवे स्मार्टफोन्स Pixel 6 आणि Pixel 6 Pro आज सादर झाले असून यामध्ये प्रथमच गूगलने स्वतःचा Google Tensor प्रोसेसर वापरला आहे आणि सॉफ्टवेअरसाठी नवं अँड्रॉइड १२ उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचं डिझाईनसुद्धा सध्याच्या फोन्सच्या तुलनेत काहीसं नवं म्हणता येईल. गूगलचे पिक्सल फोन्स त्यांच्या फोटोग्राफीसाठी खास ओळखले जातात. यामध्येही खास फोटोग्राफीसाठी अनेक नव्या सोयी देऊन सुधारणा करण्यात आल्या आहेत.

नवीन अँड्रॉइड विजेट्स

या फोनमध्ये MaterialYou डिझाईन देण्यात आलेलं आहे जे तुमच्या वॉलपेपर निवडीनुसार सर्व रंगसंगती बदलेल. नवे विजेट्स, खास अपडेट्स आता उपलब्ध होत आहेत ज्यांची डिझाईन नव्याने तयार करण्यात आलेली आहे. अलार्म, विजेट्स, डिझाईन, थीम्स अशा सर्व बाबतीत गूगलचे नवीन फोन्स नक्कीच इतर अँड्रॉइड फोन्सच्या तुलनेत चांगले वाटत आहेत.

Pixel 6 मध्ये 50MP Wide + 12MP Ultrawide आणि 48MP Telephoto कॅमेरा दिलेला आहे. 1/1.3 इंची सेन्सर दिलेला आहे जो आता १५०% अधिक लाइट कॅप्चर करू शकतो. यामुळे फोटो अधिक सुस्पष्ट आणि उत्तम कलर्स असलेला येईल. यामध्ये नवीन अल्ट्रावाईड लेन्स आणखी मोठा सेन्सर असलेल्या आहेत. Pixel 6 Pro मध्ये 4X Telephoto झूम लेन्स आहे ज्याला 20X पिक्सल Super Res Zoom ची जोड देण्यात आली आहे . Motion Mode मध्ये Action Pan आणि Long Exposure सारख्या सोयी दिल्या आहेत. Face Unblur द्वारे ब्लर झालेले फोटो सुद्धा ब्लर काढून नवा शार्प फोटो मिळेल. यासाठी डिव्हाईसमधील मशीन लर्निंगचा वापर केला जाईल.

Magic Eraser नावाच्या गूगल फोटोजमधील सोयीद्वारे आपल्या फोटोमधील नको असलेल्या व्यक्ती आणि वस्तु सहज एका क्लिकवर काढून टाकू शकतो!

गूगल पिक्सल ६ फोन्स सुद्धा पिक्सल ५ प्रमाणे भारतात उपलब्ध होणार नाही अशीच शक्यता आहे. गूगल हा निर्णय का घेत आहे याबद्दल अजूनही काहीही माहिती देण्यात आलेली नाही. या फोनची किंमत Pixel 6 साठी $599 आणि Pixel 6 Pro साठी $899 असणार आहे.

https://youtu.be/WNarpiGz3Kk

Exit mobile version