व्हॉट्सॲपवर आता स्टीकर्स तयार करण्याचाही पर्याय!

व्हॉट्सॲप या प्रसिद्ध मेसेजिंग सेवेमध्ये आता आपण स्वतःचे स्टीकर्स व्हॉट्सॲपमध्येच तयार करून शेयर करू शकणार आहोत. त्यांनी सध्यातरी हा पर्याय WhatsApp Web या व्हॉट्सॲपच्या डेस्कटॉप साईटवर दिलेला आहे. येत्या काही आठवड्यात हाच पर्याय त्यांच्या डेस्कटॉप ॲपमध्येही उपलब्ध होणार आहे. २४ नोव्हेंबरपासून हा पर्याय उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.

या पर्यायामुळे आपल्याला बाहेरच्या साइट्स किंवा ॲप्सची गरज उरणार नाही. या नव्या पर्यायाद्वारे स्टीकर्स तयार करणं अतिशय सोपं आहे.

  1. WhatsApp Web तुमच्या लॅपटॉप/पीसीवर उघडा
  2. कोणतंही एक चॅट उघडा
  3. अटॅचच्या पेपरक्लिप आयकॉनवर क्लिक करा (📎)
  4. आता इथे नवीन स्टीकरचा पर्याय दिसेल.
  5. आता स्टीकरसाठी फोटो निवडा आणि पर्याय वापरुन एडिट करा
  6. Outline टुल वापरुन बॅकग्राउंड काढून टाका. (✂️), टेक्स्ट टुलने काही टेक्स्ट लिहा, इमोजी जोडा.
  7. एडिट झाल्यावर Send बटन वर क्लिक करा.
Exit mobile version