Redmi Note 11, 11S सादर : AMOLED 90Hz डिस्प्ले, 108MP कॅमेरासह!

शायोमीच्या रेडमी ब्रॅंड अंतर्गत त्यांच्या लोकप्रिय Note मालिकेत नवे फोन्स सादर करण्यात आले असून Redmi Note 11 आणि 11S हे मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये चांगले पर्याय म्हणून उपलब्ध होत आहेत. या फोन्ससोबत रेडमीने त्यांचं नवं स्मार्ट वॉच Redmi Smart Band Pro आणि स्मार्ट टीव्ही Redmi Smart TV X43 सुद्धा सादर केले आहेत.

दोन्ही फोन्समध्ये 6.43 इंची FHD+ AMOLED डिस्प्ले मिळणार असून Note 11 मध्ये Snapdragon 680 हा प्रोसेसर, 50MP+8MP+2MP+2MP असा कॅमेरा सेटप, 13MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, सोबत 33W फास्ट चार्जिंग, 4GB किंवा 6GB चा रॅम पर्याय, 64GB किंवा 128GB चा स्टोरेज पर्याय मिळेल.

Note 11S मध्ये MediaTek Helio G96 हा प्रोसेसर, 108MP+8MP+2MP+2MP असा कॅमेरा सेटप, 16MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, सोबत 33W फास्ट चार्जिंग 6GB किंवा 8GB चा रॅम पर्याय, 64GB किंवा 128GB चा स्टोरेज पर्याय मिळेल.

Redmi Note 11

डिस्प्ले : 6.43″ FHD+ AMOLED Display 90Hz
प्रोसेसर : Snapdragon 680
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 64/128GB
कॅमेरा : 50MP Quad Camera + 8MP Ultrawide + 2MP Macro + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 13MP
बॅटरी : 5000mAh 33W
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 13
इतर : IR Blaster, Dual speakers, 3.5mm Audio jack
किंमत :
4GB+64GB ₹ १३४९९
6GB+64GB ₹ १४४९९
6GB+128GB ₹ १५९९९
हा फोन ११ फेब्रुवारीपासून Amazon, Mi ची वेबसाइट आणि दुकानांमध्ये मिळेल.

Redmi Note 11S

डिस्प्ले : 6.43″ FHD+ AMOLED Display 90Hz
प्रोसेसर : MediaTek Helio G96
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 64GB/128GB
कॅमेरा : 108MP Quad Camera + 8MP Ultrawide + 2MP Macro + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 5000mAh 33W
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 13
किंमत :
6GB+64GB ₹ १६४९९
6GB+128GB ₹ १७४९९
8GB+128GB ₹ १८४९९
हा फोन २१ फेब्रुवारीपासून Amazon, Mi ची वेबसाइट आणि दुकानांमध्ये मिळेल.

Exit mobile version