रेडमीने आज त्यांच्या Redmi Note 11 & 11S स्मार्टफोन्ससोबत नवं Redmi Smart Band Pro Sports Watch आणि Redmi X43 हा स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. नव्या स्पोर्ट्स वॉचमध्ये मोठा AMOLED Always On डिस्प्ले, SpO2 ट्रॅकिंग, वर्कआउट मोड्स, स्लिप ट्रॅकिंग, १४ दिवसांचा बॅटरी बॅकअप अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याची किंमत ३,४९९ इतकी असून हे १४ फेब्रुवारीपासून खरेदी करता येईल.
Redmi Smart Band Pro Sports Watch मधील खास सुविधा
- Big, AMOLED Color Display
- Always-On Display Support
- 100% NTSC Wide Colour Gamut
- Auto-Brightness detection
- Heart Monitoring
- Sleep and stress monitoring
- Women’s Menstrual cycle tracker
- Guided Breathing
- 110+ Pro Workout Modes
रेडमीचा नवा Smart TV X43 आता 4K HDR डिस्प्लेसह मिळणार असून यामध्ये Dolby Vision, Dolby Audio, 30W Speakers, Android TV OS, PatchWall 4 अशा सुविधा मिळणार आहेत. याची किंमत २८९९९ इतकी असून हा १६ फेब्रुवारीपासून खरेदीसाठी MiHome, Amazon आणि ऑफलाइन दुकानांमध्ये उपलब्ध होईल.