व्हॉट्सॲप Safety in India : यूजर्सच्या ऑनलाइन सुरक्षा आणि जागृतीसाठी मदतकेंद्र

WhatsApp Resource Hub

व्हॉट्सॲपने आज एक रिसोर्स हब भारतात उपलब्ध करून दिला असून याला Safety in India असं नाव देण्यात आलं आहे. या प्लॅटफॉर्मवर भारतीयांसाठी सुरक्षिततेसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत त्यांची माहिती देण्यात आली आहे. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन, फिंगरप्रिंटद्वारे सुरक्षा आणि गोपनीयता यांबद्दल देण्यात येणाऱ्या सुविधांची सर्व माहिती या वेबपेजवर एका जागी जाणून घेता येईल.

या हबवर भारतामध्ये या मेसेजिंग ॲपद्वारे काही जणांकडून सुरू असलेला गैरवापर टाळण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या पावलांची माहिती मिळेल. मेटा कंपनीच्या या व्हॉट्सॲपचे सर्वाधिक ४० कोटी यूजर्स भारतातच आहेत.

भारतामध्ये WhatsApp वरील वापरकर्त्यांची सुरक्षेची खात्री पटवणे : https://faq.whatsapp.com/general/safety-in-india/?lang=mr

वरील लिंकवर तो रिसोर्स हब मराठी भाषेतसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तो मराठी यूजर्सना सुद्धा समजण्यास सोपा आहे. याची लिंक तुम्ही आपल्या ग्रुप्स, कॉनटॅक्टमध्ये शेयर करून अधिकाधिक लोकांना उपलब्ध पर्यायांची माहिती द्यावी.

केवळ व्हॉट्सॲपवरील मेसेजमुळे किंवा स्टोरीमुळे समज-गैरसमज होऊन बरेच वाद झाले आहेत काही ठिकाणी तर गंभीर गुन्हे घडण्याचंचेही प्रकार दिसून आले आहेत. त्यामुळे आपण वापरत असलेल्या माध्यमाचा योग्य वापर करणं नक्कीच गरजेचं आहे.

फॉरवर्ड करण्यावर मर्यादा सेट करणे, व्हायरल मेसेजेसवर अतिरिक्त मर्यादा सेट करणे, ग्रुप गोपनीयता सेटिंग, एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेला बॅकअप, एक्स्पायर होणारे मेसेजेस, टच आयडी किंवा फेस आयडी वापरून तुमचे WhatsApp लॉक करणे

ब्लॉक करणे आणि तक्रार नोंदवणे, मेसेजची तक्रार करणे यासाठी तक्रार निवारण अधिकारीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या वेबपेजवर अधिक माहिती घेऊ शकता.

चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे हे एक भारतातलं मोठं आव्हान आहे. त्यासाठी WhatsApp मध्ये सत्यता पडताळणे, सार्वजनिक शैक्षणिक मोहिमा, सुरक्षित निवडणुकांना सपोर्ट करणे अशा गोष्टी करण्यात येत आहेत.

Exit mobile version