WhatsApp Communities : व्हॉट्सॲपची नवी सोय : अनेक ग्रुप्सचं एकत्र नियंत्रण!

व्हॉट्सॲपने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांनी अनेक नव्या सोयी जोडत असल्याचं जाहीर केलं असून यामधील मुख्य सोय म्हणजे WhatsApp Communities. अनेक ग्रुप्स एकत्र करून ते नियंत्रित करणं आता एकदम सोपं होणार आहे. याशिवाय आता 2GB पर्यंतची साईज असलेल्या फाइल्स पाठवता येतील, ३२ लोकांचा ग्रुप कॉल करता येईल आणि मेसेजवर रिएक्शन्ससुद्धा देता येतील!

व्हॉट्सॲप कम्युनिटीज मुळे समजा एखादी शाळा असेल आणि ते प्रत्येक वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वेगवेगळे ग्रुप्समार्फत मेसेजद्वारे माहिती देत असतील तर आता त्यांना ते सर्व वर्गांचे ग्रुप एक कम्यूनिटी बनवता येईल ज्यामध्ये हे सर्व ग्रुप एकत्र दिसतील. मग यामध्ये खास टूल्स असतील जसे की सर्वाना एकाचे वेळी मेसेज करणे, ग्रुपमध्ये कोणाचा समावेश करायचा याचं नियंत्रण, इ.

शाळेतील पालक, स्थानिक क्लब्ज, किंवा छोट्या कार्यालयांमध्येही आता लोकांना माहिती देण्यासाठी WhatsApp चा वापर केला जात आहे. या ग्रुप्सना सोशल मीडियापेक्षा वेगळ्या, पण ईमेल किंवा केवळ ब्रॉडकास्ट चॅनल पलीकडेही रिअल-टाईम संभाषण सुकर करणारी अधिक साधने पुरविणाऱ्या संपर्क साधण्याच्या खाजगी मार्गांची गरज आहे आणि त्यासाठीच व्हॉट्सॲप कम्युनिटीजची निर्मिती करण्यात आली आहे असं व्हॉट्सॲपतर्फे सांगण्यात आलं आहे. ही सोय सध्या थोड्या युजर्ससाठीच हळूहळू उपलब्ध करून देण्यात येत असून येणाऱ्या काळात सर्वांसाठी उपलब्ध होईल.

लवकरच व्हॉट्सॲपवर येणाऱ्या नव्या सोयी!

पुढील मार्गदर्शक तत्वे अनुसरून व्हॉट्सॲप ग्रुप्सना व्हॉट्सॲपवर खाजगी आणि सुरक्षित पद्धतीने संवाद साधता यावा यासाठी काही अपडेट्स तयार आणत आहे.

Search terms : What is WhatsApp Communities , How to use whatspp communities, now send large files in whatsapp upto 2GB, whatsapp message reactions

Exit mobile version