मायक्रोसॉफ्ट रिवार्ड्स भारतात उपलब्ध : एज ब्राऊजर वापरा व बक्षिसे मिळवा!

मायक्रोसॉफ्टचा Microsoft Rewards नावाचा प्रोग्राम भारतातसुद्धा उपलब्ध झाल्याचं दिसून येत आहे. या प्रोग्राममध्ये मायक्रोसॉफ्ट आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या सेवा वापरल्याबद्दल बक्षिसे पाठवतं! यासाठी त्यांच्या एज ब्राऊजरमध्ये वेबसाइट्स पाहणं, बिंग या सर्च इंजिनचा माहिती शोधण्यासाठी वापर करणं, एक्सबॉक्सवर गेम्स खेळणं अशा गोष्टी कराव्या लागतात.

  1. https://rewards.microsoft.com/welcome या लिंकवर जा
  2. मायक्रोसॉफ्टच्या ईमेल आयडीने Sign Up करा.
  3. नंतर येणाऱ्या डॅशबोर्डवर सांगितलेल्या टास्क पूर्ण करा.
  4. तुम्हाला लगेच रिवॉर्ड पॉइंट जमा झालेले दिसतील.

ही सेवा पूर्वी Bing Rewards म्हणून उपलब्ध होती. २०१८ मध्येही ही सेवा भारतात आणण्यात आली होती मात्र सहा महिन्यातच पुन्हा बंद करण्यात झाली. आतासुद्धा त्यांच्या अलीकडे प्रकाशित करण्यात आलेल्या यादीत भारताचं अधिकृतरित्या नाव दिसत नाही मात्र तुम्ही मायक्रोसॉफ्ट रिवॉर्डसच्या साईटवर जाऊन संबंधित प्रक्रिया पूर्ण करून उपलब्ध कुपन्ससारखी बक्षिसे पाहू शकता जी भारतात वापरण्यासाठी देण्यात येत आहेत.

खालील प्रमाणे विविध गेम्ससाठी गिफ्ट कार्ड, Flipkart, Croma, Amazon, CCD, BookMyShow, Uber सारख्या सेवांमध्ये वापरता येतील असे गिफ्ट कार्ड किंवा कुपन्स मिळवू शकता!

या प्रोग्राम अंतर्गत भारतात मिळणारे रिवॉर्ड

तुम्हाला मिळालेले पॉईंट्स तुम्ही वरीलपैकी आवडीनुसार कोणत्याही कुपन साठी redeem करू शकता.

सध्या जगभरात जवळपास सर्वच डिव्हाईसवर युजर्स ब्राऊजरसाठी गूगलच्या क्रोम ब्राऊजरचा आणि कोणत्याही गोष्टीचा शोध घेण्यासाठी गूगलचा वापर करतात. त्यांना स्वतःच्या सेवांकडे वळवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने हा rewards प्रोग्राम सुरू केला आहे. यासाठी वेगळं काही करण्याचीही गरज नसून केवळ त्यांचा ब्राऊजर वापरुन तुमच्या नेहमीच्या वेबसाइट्स पहायच्या आहेत!

प्रायव्हसी संबंधित प्रश्न असेल तर तुमचा ब्राऊजिंग डेटा क्रोममधून गूगलकडे जातो त्याऐवजी मायक्रोसॉफ्टकडे जाईल एव्हढाच काय तो फरक..!

Search Terms : Microsoft Rewards Bing Rewards in India

Exit mobile version