व्हॉट्सॲपवरही आता स्टेटस रिॲक्शन्स उपलब्ध : सोबत इतरही नवे फीचर्स!

WhatsApp Reactions

व्हॉट्सॲपच्या नव्या अपडेटमध्ये आता स्टेटसवर रिॲक्शन देण्यासाठी ८ इमोजी असलेला पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेक दिवस याची चर्चा सुरू होती. इंस्टाग्रामवर बरेच महीने उपलब्ध असलेली ही सोय आता व्हॉट्सॲपवरही मिळणार आहे. हे अपडेट हळूहळू सर्व यूजर्ससाठी दिलं जाणार आहे. प्ले स्टोअर व ॲपवर व्हॉट्सॲप अपडेट करून घ्या.

😍😂😮😥🙏👏🎉💯 या आठ इमोजीचा सध्या रिॲक्शनमध्ये समावेश असून कदाचित येणाऱ्या काळात आणखी इमोजीचा पर्याय दिला जाईल. कुठल्याही स्टोरी/स्टेट्सवर react करण्यासाठी त्या स्टेट्सवर क्लिक करून खाली दिसत असलेल्या Reply वर टॅप करा आणि समोर तुम्हाला या इमोजीचा पर्याय दिसेल.

खरतर यामध्ये reactions म्हणावं असं वेगळं काही नाही. आपण पूर्वी स्टेट्सला मेसेजद्वारे रिप्लाय द्यायचो तसाच रिप्लाय यामार्फत जाणार आहे. फक्त त्यासाठी एक शॉर्टकट दिल्यासारखा हा पर्याय आहे.

व्हॉट्सॲपने यापूर्वी मेसेजेसवर रिॲक्ट करण्यासाठी पर्याय दिला आहेच. त्यामध्येही आता सर्व इमोजीचा समावेश आहे.

यासोबत व्हॉट्सॲपने कॉल लिंक्स सुद्धा आणल्या आहेत. ज्यामुळे गूगल मीट प्रमाणे आपल्या व्हॉट्सॲप कॉल्सचीसुद्धा लिंक शेयर करू शकाल आणि त्या लिंकद्वारे समोरची व्यक्ती ग्रुप ऑडिओ/व्हिडिओ कॉल जॉइन करू शकेल.

यापूर्वी सांगितलेलं इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येण्याची सोय आता सर्वांना उपलब्ध झाली आहे. आता फक्त ग्रुप सोडल्याचं admin लाच कळेल. शिवाय आता ग्रुप ॲडमिन ग्रुपच्या मेंबर्सचे मेसेजेस डिलिट करू शकेल. डिलिट केलेला मेसेज कोणी डिलिट केला आहे हे मेंबर्सना दिसेल.

Delete for me म्हणजेच फक्त माझ्यासाठी माझ्या फोनमधून मेसेज डिलिट करण्याचा पर्याय वापरल्यावर त्याला Undo करण्यासाठी आता काही सेकंद देण्यात येतील जेणेकरून चुकून डिलीट फॉर मी वापरल्यास तो मेसेज परत मिळवता येईल.

Exit mobile version