इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

इंस्टाग्राम म्हणजे असा प्लॅटफॉर्म होता ज्याची सुरुवात फक्त फोटो शेयर करण्याचं सोपं माध्यम म्हणून झाली होती त्याचं आता पूर्णपणे व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर झालं असून यामध्येच आता नवा पर्याय म्हणजे हा फोटो पोस्ट करताना सोबत गाणं/संगीत जोडता येईल.

पूर्वी तुम्हाला जर फोटोला गाणं जोडायचं असेल तर एडिटिंग मध्येच ते जोडून ते एक व्हिडिओ प्रमाणे अपलोड करावं लागायचं ज्यामुळे त्याची क्वालिटी चांगली दिसत नव्हती शिवाय लोक कमेंट्समध्ये फोटो व्हिडिओ म्हणून टाकल्यामुळं राग व्यक्त करायचे तो वेगळाच…

आता फीडमध्ये पोस्ट करताना फोटो खाली स्वतंत्र असेल आणि गाण्याचं शीर्षक त्या फ्रेममध्येच पण फोटोच्या वर दिसेल यामुळे फोटोची क्वालिटी आहे अशी चांगली असेल आणि गाणंसुद्धा त्याच्यासोबत वाजू लागेल.

  1. उजव्या कोपऱ्यात + आयकॉनवर टॅप करा
  2. आता खाली पोस्टचा पर्याय निवडा
  3. पोस्ट करण्यासाठी फोटो गॅलरीमधून निवडा
  4. आता जुन्या Write a Caption, Add Location अशा पर्यायांसोबत Add Music हा पर्याय आलेला दिसेल.
  5. मग तुम्हाला काही गाण्यांची यादी दिसेल त्यापैकी एक किंवा आवडीनुसार वर सर्च करून कोणतंही गाणं निवडू शकता.
  6. गाण्याची लांबी तुमच्या पासतीनुसार ठेऊ शकता. ५ सेकंद ते ९० सेकंद अशी मर्यादा आहे.
  7. आता पोस्ट नेहमीप्रमाणे पोस्ट करा.

ही सोय १० नोव्हेंबर पासून उपलब्ध होण्यास सुरुवात झाली होती आता सर्वांना हा पर्याय दिसत असेल.

यापूर्वी Add Reminder नावाचा पर्यायसुद्धा खाली आला आहे. एखाद्या कार्यक्रमाची (Event) माहिती देण्यासाठी हा पर्याय असून पोस्टखाली कार्यक्रम नाव आणि वेळ पाहता येईल. दिलेल्या वेळेला नोटिफिकेशनसुद्धा दिसेल.

Exit mobile version