ॲपलचं भारतातलं पहिलं अधिकृत दुकान बीकेसीमध्ये सुरू!

ॲपलने आज Apple BKC नावाने त्यांचं भारतातील पहिल्या Apple Store चे उद्घाटन केलं असून मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) इथे हे आलिशान दुकान सुरू झालं आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲपलची उत्पादने समोर पाहून अधिकृतरित्या खरेदी करू शकता.

या उद्घाटनासाठी स्वतः सीईओ टीम कुक भारतात आले आहेत. त्यांनी काल अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत वडापावचाही आस्वाद घेतला!

या निमित्ताने त्यांनी मुंबई रायझिंग नावाची सुरू केली असून आणखी काही महिने ही सुरू असेल. यामध्ये प्रेक्षक, स्थानिक कलाकार यांना एकत्र आणून त्यांच्यासाठी मोफत सेशन्स ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये ॲपल उत्पादने वापरुन त्यांचं काम कसं करता येईल हे दाखवलं जाईल.

Mumbai Rising मध्ये खालील सेशन्सचा समावेश आहे :

हे दुकान १००% अक्षय ऊर्जेवर म्हणजेच Renewable Energy वर चालतं आणि हे आता कार्बन न्यूट्रल म्हणजे कार्बन उत्सर्जनरहितसुद्धा आहे!

१०० हून अधिक कर्मचारी ग्राहकांच्या सेवेत सज्ज असणार आहेत. एकत्रित २० पेक्षा अधिक भाषा बोलणारा हा कर्मचारीवर्ग इथे आहे! ॲपल चाहत्यांना भेट देण्यासाठी हे नक्कीच चांगलं ठिकाण असणार आहे. इथे ॲपल उत्पादनांवर वेगळी सूट मिळेल अशी अपेक्षा मात्र ठेऊ नका. प्रत्यक्ष वस्तू पाहून खरेदी करणे, एक्स्चेंज, स्टुडंट ऑफर्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यात चांगला सपोर्ट अनुभव मिळेल.

Exit mobile version