गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!

गूगलने त्यांच्या Google I/O 2023 वार्षिक डेव्हलपर कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी जाहीर केल्या असून यावेळी त्यांचा अधिकाधिक AI आधारित सुविधा आणण्यावर भर असल्याचं दिसत आहे. Pixel 7a आणि Pixel Fold हे स्मार्टफोन्स, Pixel टॅब्लेट, अँड्रॉइड १४, Bard AI, PaLM 2 AI model, फोटोजमध्ये AI, Search Labs Project Starline आणि नवं Home App ही नवी उत्पादने आणि सेवा उपलब्ध केल्या आहेत.

Pixel 7a : पिक्सल 7a हा फोन भारतातसुद्धा मिळणार असून यामध्ये 90Hz डिस्प्ले, G2 प्रोसेसर, 64MP (OIS) + 13MP कॅमेरा, 13MP फ्रंट कॅमेरा अशा सुविधा आहेत. याची किंमत भारतात ४३९९९ इतकी असेल आणि हा फ्लिपकार्टवर मिळेल.

Pixel Fold : गूगलने आता त्यांचा स्वतःचा घडी घालता येईल असा फोन आणला आहे. यामध्येही G2 प्रोसेसर, 7.6″ डिस्प्ले, दुसरा 5.8″ डिस्प्ले, 48MP+10.8MP+10.8MP असा कॅमेरा सेटप आणि आतल्या बाजूला 8MP कॅमेरा आहे. याची किंमत USD 1799 असून हा भारतात मिळणार नाही.

Bard AI : गूगलचा ChatGPT ला उत्तर म्हणून आलेला चॅटबॉट Bard आता सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. bard.google.com वर जाऊन तुम्ही याचा वापर करू शकता. सध्या हा चाचणी स्वरूपात उपलब्ध आहे.

गूगलने Generative AI साठी Adobe Firefly सोबत भागीदारी केली असून याद्वारे आपण कोणत्याही प्रकारचा टेक्स्ट लिहल्यास त्यानुसार इमेजेस लगेच तयार करून मिळतात!

Google Maps : गूगल मॅप्समध्ये आता आपला नॅविगेशन साठी सेट केलेला रस्ता 3D मध्ये पाहता येईल ज्यामध्ये उपलब्ध शहरांचा 3D डेटा स्क्रीनवर दिसेल आणि आपल्याला दिशा पाहणं आणखी सोपं होईल.

Cinematic Wallpaper : अँड्रॉइडमध्ये आता खास अॅनिमेशन असलेले स्वतःचे वॉलपेपर लावता येतील. आयफोनप्रमाणे वॉलपेपरसाठी कस्टमायझेशनसुद्धा करता येईल.

Photos : गूगल फोटोजमध्ये आता Magic Editor नावाची सोय येणार असून याद्वारे आपण फोटोमधील वस्तूची जागा बदलू शकता, वस्तू जोडू शकता आणि चक्क फोटोमधील आकाश एका क्लिकवर बदलू शकता.

Exit mobile version