आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

WhatsApp Chat Lock

मेटाचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी काल त्यांच्या मेटा चॅनलद्वारे या व्हॉट्सॲपवरील नव्या सुविधेबद्दल माहिती दिली आहे. आता तुम्हाला एखादं चॅट लॉक करून ठेवायचं असेल तर तसा Chat Lock नावाचा पर्याय दिला असून याद्वारे लॉक केलेले चॅट Locked Chats विभागात जातील आणि त्यामधील संभाषणं पाहण्यासाठी तुमचा फिंगरप्रिंट, पासकोड किंवा FaceID लागेल.

आपलं एखाद्या व्यक्तिसोबत असलेलं खासगी संभाषण आणखी सुरक्षित करून ठेवण्यासाठी हा पर्याय आहे. पूर्वी जर समोरच्या व्यक्तीला आपला फोन इतर गोष्टी पाहण्यासाठी दिला असेल तर त्यांच्याकडून व्हॉट्सॲपवरील संभाषण पाहिलं जाऊ शकत होतं मात्र आता तसे चॅट लॉक करून ठेवता येतील.

चॅट लॉक केल्याने तो थ्रेड इनबॉक्समधून बाहेर काढला जातो आणि तो त्याच्या स्वतःच्या फोल्डरच्या मागे ठेवतो ज्यामध्ये फक्त तुमच्या डिव्हाइस पासवर्डने किंवा फिंगरप्रिंट सारख्या बायोमेट्रिकद्वारे ॲक्सेस केला जाऊ शकतो. ते त्या चॅटचे कंटेन्ट नोटिफिकेशन्समध्ये देखील स्वयंचलितपणे लपवते. शिवाय या लॉकमध्ये असलेल्या मेसेजेसमधील फोटो, व्हिडिओ बाहेरच्या गॅलरी/फोटोज ॲपमध्ये दिसणार नाहीत.

चॅट लॉक कसं करायचं

  1. कोणत्याही सिंगल किंवा ग्रुप चॅट वर जा
  2. उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या तीन डॉटवर टॅप करा
  3. आता View Contact वर जा
  4. आता खाली गेल्यावर Chat Lock चा पर्याय आलेला दिसेल
  5. आता ते चॅट तुमच्या फिंगरप्रिंट ने लॉक केलं जाईल.
  6. ही पाहण्यासाठी व्हॉट्सॲप उघडल्यावर खाली स्वाईप करा मग तुम्हाला Locked Chats चा फोल्डर दिसेल.

ही सोय अपडेटद्वारे हळूहळू उपलब्ध करून देण्यात येत असून तुम्हाला Chat Lock चा पर्याय दिसत नसेल तर आणखी काही दिवस वाट पहावी लागेल. प्ले स्टोअरवर नवीन अपडेट उपलब्ध होईल.

Exit mobile version