गूगलचा Bard AI आता मराठीतसुद्धा उपलब्ध!

गूगलने काही दिवसांपूर्वी त्यांच्या AI चॅटबॉट Bard मध्ये ४० हून अधिक भाषांचा समावेश केला असून यामुळे आता आपण या AI सोबत मराठीत बोलून माहिती मिळवू शकता! आता मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड, मल्याळम, गुजराती अशा भारतीय भाषांचा सपोर्ट उपलब्ध झाला आहे.

गूगलचा Bard AI वापरण्यासाठी लिंक : https://bard.google.com

अलीकडेच ChatGPT नेसुद्धा भारतीय भाषांना सपोर्ट उपलब्ध करून दिला आहे. आता या दोन्ही सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या AI चॅटबॉटमध्ये मराठी वापरता येईल. या चॅटबॉट्सकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकता. मिळालेली माहिती अपुरी वाटली तर अधिक स्पष्टीकरण मागू शकता. यासोनत गूगलने आता बार्डमध्ये इमेजेस अपलोड करण्याची सोय दिली आहे जेणेकरून त्या इमेज बद्दल अभ्यास करून त्यानुसार तुम्ही प्रश्न विचारू शकता!

ChatGPT vs Google Bard in Marathi
Google Bard आणि ChatGPT यांना मराठी भाषेत सारखाच प्रश्न विचारल्यावर मिळालेली उत्तरे

मराठीत टाइप कसं करायचं याबद्दल आमचे व्हिडिओ पाहू शकता. Marathi Typing

सर्वच AI चॅटबॉटच्या खाली तुम्हाला एक तळटीप दिलेली दिसते ती म्हणजे AI द्वारे देण्यात आलेली माहिती कधी कधी चुकीची असू शकते. यामुळे हे लक्षात ठेऊनच याद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करा. माहितीबद्दल खात्री करून घेण्यासाठी गूगलवर स्वतंत्र सर्च करून विश्वासार्ह वेबसाइट्सवर पहा.

Exit mobile version