व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

व्हॉट्सॲप चॅनल्स नावाची नवी सोय आता तुमच्या सर्वांच्या फोनमध्ये उपलब्ध होत आहे. या सेवेद्वारे सेलेब्रिटी, व्यावसायिक, न्यूज मीडिया, कंपन्या, संस्था त्यांचे अपडेट्स/पोस्ट्स/व्हिडिओ प्रकाशित करू शकतील. या चॅनल्सना आपण फॉलो करून त्या त्या चॅनलचे अपडेट्स मिळवू शकतो. चॅनल्स आपल्या नेहमीच्या चॅटपासून स्वतंत्र अशी वेगळी सेवा आहे.

ज्यांनी चॅनल्स तयार केलं आहे त्या Admin ना तुमचा फोन नंबर दिसणार नाही आणि त्यांचा फोन नंबरसुद्धा तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे दोघांची माहिती एकमेकांपासून गोपनीय राहील. चॅनल Admin ना तुमच्या प्रायवसी सेटिंगनुसार तुमचं नाव मात्र दिसू शकेल.
Verified सेलेब्रिटी आणि बिझनेसेससमोर हिरव्या रंगाचं टिक दिसेल. हे टिक सध्यातरी मेटा कंपनी त्यांच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मतर्फे ठराविक लोकांनाच देत आहे.

व्हॉट्सॲप चॅनल्स मध्ये खालील सुविधा आहेत.

तुम्हीसुद्धा स्वतःचं चॅनल तयार करू शकता. Updates च्या Channels विभागात जाऊन + चिन्हावर टॅप केल्यावर Create Channel चा पर्याय दिसेल त्याद्वारे तुमच्या चॅनलचं नाव आणि प्रोफाइल पिक्चर सेट केलं की तुमच चॅनल तयार होतं! याची लिंक शेयर करण्याचा पर्यायसुद्धा दिसेल. सध्या चॅनल तयार करण्याचा पर्याय सर्वांना उपलब्ध झालेला नाही. काही दिवसात होईल.

WhatsApp Business मध्येही आता अनेक नव्या सोयी मिळणार आहेत.

Faster Chat Experiences with Flows : WhatsApp Flows द्वारे तुमची ट्रेनमधील सीट निवडणे, जेवण ऑर्डर करणे किंवा अपॉइंटमेंट बुक करणे अशी कामे करता येतईल. यासाठी तुमच्या चॅटमधून बाहेर पडावे लागणार नाही. Flows द्वारे बिझनेसेस मेनू आणि वेगवेगळ्या बुकिंगसारख्या सेवा देऊ शकतील. येत्या आठवड्यांमध्ये WhatsApp Business प्लॅटफॉर्म वर Flow उपलब्ध होईल.

पेमेंटसाठी आता अनेक पर्याय : WhatsApp Business मध्ये पैसे देण्यासाठी आता UPI च्या विविध Apps क्रेडिट/डेबिट कार्ड, नेटबँकिंगचाही पर्याय मिळेल. यासाठी त्यांनी RazorPay आणि PayU सोबत भागीदारी केली आहे.

Exit mobile version