सॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता GalaxyAI सह!

सॅमसंगने काल रात्री झालेल्या कार्यक्रमात त्यांचे नवे फ्लॅगशिप फोन्स सादर केले असून यामध्ये Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra चा समावेश आहे. यावेळी सॅमसंगनेसुद्धा AI ची जोड देत या तिन्ही फोन्समध्ये Galaxy AI द्वारे अनेक सोयी दिल्या आहेत. या फोन्सना तब्बल ७ अँड्रॉइड ओएस अपडेट्स मिळणार असल्याचं सॅमसंगने जाहीर केलं आहे! म्हणजेच Android 21 पर्यंत अपडेट्स मिळू शकतील!

या मालिकेतील पुढील प्रमाणे काही गोष्टी तिन्ही फोन्समध्ये मिळतील : तिन्ही फोन्समध्ये OneUI 6.1 ही Android 14 आधारित ओएस असेल. IP68, LTPO AMOLED डिस्प्ले, 120Hz refresh rate, NFC, Corning Gorilla Glass Victus 3

Galaxy AI

सॅमसंगने यावेळी प्रथमच त्यांच्या फोन्समध्ये AI आधारित फीचर्सचा स्वतंत्र समावेश करत बऱ्याच सोयी दिल्या आहेत.

Galaxy S24 Ultra : या फोनमध्ये 6.8″ Dynamic AMOLED 2X 120 Hz Quad HD+ डिस्प्ले, 2600Nits Brightness, 200MP + 50MP + 12MP + 10MP असा मागचा कॅमेरा सेटप, 8K रेजोल्यूशन व्हिडिओ रेकॉर्डिंग, 5X Optical Zoom, 100x Digital Zoom, सेल्फीसाठी 12MP कॅमेरा, Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, 12GB रॅम, 256GB/512GB/1TB UFS 4.0 स्टोरेज, USB 3.2 Gen 1, Bluetooth v5.3, NFC, 5000mAh बॅटरी

Galaxy S24 Ultra
256GB – ₹1,29,999
512GB – ₹1,39,999
1TB – ₹1,59,999

Galaxy S24+ : या फोनमध्ये 6.7″ Dynamic AMOLED 2X 120 Hz Quad HD+ डिस्प्ले, 50MP + 10MP + 12MP असा मागचा कॅमेरा सेटप, 8K रेजोल्यूशन व्हिडिओ रेकॉर्डिंग, 3X Optical Zoom, 30x Digital Zoom, सेल्फीसाठी 12MP कॅमेरा, Exynos 2400 प्रोसेसर, 12GB रॅम, 256GB/512GB स्टोरेज, USB 3.2 Gen 1, Bluetooth v5.3, NFC, 5000mAh बॅटरी

Galaxy S24+
256GB – ₹99,999
512GB – ₹1,09,999

Galaxy S24 : या फोनमध्ये 6.2″ Dynamic AMOLED 2X 120 Hz FHD+ डिस्प्ले, 50MP + 10MP + 12MP असा मागचा कॅमेरा सेटप, 8K रेजोल्यूशन व्हिडिओ रेकॉर्डिंग, 3X Optical Zoom, 30x Digital Zoom, सेल्फीसाठी 12MP कॅमेरा, Exynos 2400 प्रोसेसर, 8GB रॅम, 256GB/512GB स्टोरेज, USB 3.2 Gen 1, Bluetooth v5.3, NFC, 5000mAh बॅटरी

Galaxy S24
256GB – ₹79,999
512GB – ₹89,999

Galaxy Ring

याच कार्यक्रमात सॅमसंगने Galaxy Ring चीही घोषणा केली मात्र याबद्दल अधिक माहिती नंतर सांगितली जाईल. ही एक हेल्थ ट्रॅकिंग स्मार्ट अंगठी आहे.

Galaxy AI मधील काही सोयी खालील फोन्सवरसुद्धा उपलब्ध होणार आहेत.

Exit mobile version