व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

गेले अनेक महीने चाचणी सुरू असलेलं व्हॉट्सॲपच्या नॅविगेशन बारचं नवं डिझाईन आता सर्वाना उपलब्ध झालं आहे. Chats, Status, Calls असलेला हा बार पूर्वी वर होता आणि आता त्याला चॅट्सच्या खालच्या बाजूला ठेवण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्यापासून याची चाचणी सुरू होती आणि टप्प्याटप्प्यात ठरविक युजर्सना ही डिझाईन उपलब्ध करून देण्यात येत होतं आता अचानक सर्वांच्या फोन्सवर हा मोठा बदल झाल्यामुळे अनेक जन गोंधळले आहेत.

यावर सोशल मीडियावर बऱ्याच मीम्ससुद्धा येत आहेत.

आता यापुढे आणखी नव्या बदलांचीसुद्धा चाचणी सुरू झाली आहे. नव्या डिझाईनमध्ये कॉलिंग स्क्रीनमध्ये थोडा बदल, कॉल्स टॅबमध्ये Favorites, Default Upload Quality सेट करण्याचा पर्याय, स्टेट्स अपलोड मध्ये काही बदल, Meta AI च्या मदतीने सर्च, AI-powered फोटो एडिटिंग, इ. बरेच बदल पाहायला मिळतील.

Exit mobile version