इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

इंस्टाग्रामचं Edits (एडिट्स) अ‍ॅप आता सर्वांना मोफत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हे अ‍ॅप मंगळवारी लाँच करण्यात आलं मात्र हे लाँच होण्याआधी जवळपास तीन महिन्यांपूर्वी या अ‍ॅपची घोषणा करण्यात आली होती. हे ॲप फोनवरच व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी असून यामध्ये उच्च-गुणवत्तेचा व्हिडिओ कॅप्चर, कीफ्रेमिंग, स्वयंचलित कॅप्शन्स आणि रिझोल्यूशन, फ्रेम रेट व डायनॅमिक रेंजसाठी कॅमेरा कंट्रोल्ससह अनेक क्रिएटिव्ह टूल्स दिली आहेत.

इंस्टाग्रामनुसार, ‘एडिट्स’ वापरणारे यूजर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून अधिक क्रिएटिव्ह पद्धतीने व्हिडिओ एडिट करू शकतात, ज्यात AI इमेज अ‍ॅनिमेशन आणि विविध इफेक्ट्सचा समावेश आहे. हे अ‍ॅप iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे.

ADVERTISEMENT

हे अ‍ॅप व्हिडिओ एडिटिंगची पूर्ण प्रक्रिया सोपी करून कंटेंट क्रिएशन अधिक सोपे करण्याच्या उद्देशाने लाँच करण्यात आले आहे. हे क्रिएटर्सना केवळ फेसबुक आणि इंस्टाग्रामपुरते मर्यादित न ठेवता इतरही प्लॅटफॉर्मवर स्वतःला व्यक्त करण्याची संधी देईल, असे इंस्टाग्राम आणि एडिट्सची कंपनी ‘मेटा प्लॅटफॉर्म्स’ने सांगितले आहे.

क्रिएटर्सना फ्रेम रेट, डायनॅमिक रेंज आणि रिझोल्यूशनसाठी कॅमेरा सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करता येतील. इंस्टाग्रामच्या तुलनेत उच्च रिझोल्यूशनमध्ये 10 मिनिटांचे व्हिडिओ कॅप्चर करण्याचाही पर्याय असेल. टच-अप, वन-टॅप ग्रीन स्क्रीन, म्युझिक कॅटलॉग, टाइमर आणि काउंटडाऊनसारखी टूल्स पटकन वापरता येतील.

एडिट्स अ‍ॅपमधील ‘कीफ्रेमिंग’ फिचरमुळे यूजर्स विशिष्ट क्षणांमध्ये क्लिप्सचे पोझिशन, रोटेशन आणि स्केल अचूकपणे अ‍ॅनिमेट करू शकतात. AI इमेज अ‍ॅनिमेशन टूल स्टिल इमेजेसना डायनॅमिक व्हिडिओमध्ये रूपांतरित करू शकतो. याशिवाय, ग्रीन स्क्रीन वापरून पार्श्वभूमी (Background) बदलता येते किंवा व्हिडिओ ओव्हरलेसुद्धा अ‍ॅड करता येतात. अ‍ॅपमध्ये वेगवेगळ्या टायपफेसेस, साउंड आणि व्हॉइस इफेक्ट्स, फिल्टर्स, स्टिकर्स व इतर क्रिएटिव्ह एलिमेंट्सचा समावेश आहे.

ऑडिओमधील बॅकग्राऊंड नॉईस काढून टाकण्याची आणि ऑटो-कस्टमायझेबल कॅप्शन्स तयार करण्याचीही सुविधा आहे. एडिट्सवर तयार करण्यात आलेले व्हिडिओ मेटाच्या इतर अ‍ॅप्सवर – जसे की फेसबुक आणि इंस्टाग्राम – सहज शेअर करता येतील. तसेच इतर अ‍ॅप्सवर पोस्ट करण्यासाठी व्हिडिओ एक्सपोर्ट करता येतो आणि त्यात वॉटरमार्क नसेल.

Edits मध्ये लवकरच काही खास अपडेट्स येणार आहेत:

Edits हे अ‍ॅप आता जगभरात उपलब्ध असून App Store आणि Google Play Store वरून मोफत डाउनलोड करता येईल. सुरुवात करण्यासाठी फक्त तुमचं Instagram अकाउंट वापरून साइन इन करा.

टिकटॉकच्या (जे आता भारतात उपलब्ध नाही) CapCut व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅपची लोकप्रियता पाहून मेटाने हे अ‍ॅप आणलं असावं. आता हे Edits अ‍ॅप व्हिडिओ एडिटिंगसाठी वॉटरमार्क शिवाय वापरता येईल असा चांगला पर्याय असेल.

Exit mobile version