ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

Apple ने काल रात्री त्यांच्या “Awe-Dropping” कार्यक्रमात iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि संपूर्णपणे नवीन iPhone Air हे नवं मॉडेल सादर केलं आहे. यासोबत Apple Watch Series 11, Apple Watch Ultra 3, SE 3 आणि AirPods Pro 3 सुद्धा सादर झाले आहेत. iPhone Plus मॉडेल आता बंद करण्यात आलं असून त्याची जागा आता नव्या iPhone 17 Air ने घेतली आहे जो त्यांचा सर्वात कमी जाडीचा आयफोन असेल.

iPhone 17 Air हा त्यांचा आजवरचा Thinnest (कमी जाडीचा) फोन असून याची जाडी केवळ 5.6mm इतकीच आहे! या आयफोनमध्ये पाठीमागे केवळ एकच कॅमेरा आहे. यामध्ये २७ तासांचा व्हिडिओ प्लेबॅक करण्याची क्षमता असलेली बॅटरी आहे असं ॲपलने सांगितलं आहे (बंद केलेल्या Plus मॉडेल एव्हढी). फोनची जाडी कमी असूनही त्याची बॅटरी लाईफ चांगली असेल.

iPhone 17 मधील सोयी पुढील प्रमाणे : 6.3″ 120Hz Super Retina XDR OLED डिस्प्ले, 3000nits Peak Brightness, Apple A19 प्रोसेसर, 48MP Main (Sensor Shift OIS) + 48MP Ultrawide, 18MP फ्रंट कॅमेरा, 8GB रॅम

iPhone 17 Air मधील सोयी पुढील प्रमाणे : 6..5″ 120Hz Super Retina XDR OLED डिस्प्ले, 3000nits Peak Brightness, Apple A19 Pro प्रोसेसर, 48MP Main (Sensor Shift OIS), 18MP फ्रंट कॅमेरा with Center Stage, 12GB रॅम

iPhone 17 Pro आणि Pro Max मधील सोयी पुढील प्रमाणे : 6.3″ / 6.9″ 120Hz Super Retina XDR OLED डिस्प्ले, 3000nits Peak Brightness, Apple A19 Pro प्रोसेसर, 48MP Main (Sensor Shift OIS) + 48MP Ultrawide + 48MP Telephoto, 18MP फ्रंट कॅमेरा with Center Stage, 12GB रॅम

या सर्व आयफोन्समध्ये ॲपलची नवी N1 Wireless Networking चिप असेल ज्यामध्ये WiFI7, Bluetooth 6 चा सपोर्ट आहे. iPhone Air मध्ये C1X मोडेमचा सपोर्ट आहे. यावेळी Recyled अॅल्युमिनियम पासून बनवलेल्या आयफोन्सबद्दल त्यांनी बरीच माहिती दिली आहे. सोबत डिस्प्लेवर Ceramic Shield 2 असून यामुळे तीन पट अधिक चांगलं Scratch Resistance मिळेल. यावेळी प्रथमच सर्व आयफोन्समध्ये किमान 256GB स्टोरेज असेल

iOS 26 अपडेट सर्व जुन्या व नव्या फोन्सवर १५ सप्टेंबरपासून उपलब्ध होईल.

काल जाहीर झालेल्या सर्व ॲपल उत्पादनांची भारतीय किंमत खालील प्रमाणे

Exit mobile version