OpenAI ने आज काही वेळापूर्वी त्यांचा स्वतःचा ब्राऊजर जाहीर केला असून याचं नाव ChatGPT Atlas (चॅटजीपीटी ॲटलस) असं असेल. हा AI आधारित ब्राऊजर असून ChatGPT अंतर्भूत आहे. आज फक्त macOS वर उपलब्ध झाला असून विंडोज, iOS आणि अँड्रॉइडवर नंतर उपलब्ध होणार आहे.
ChatGPT Atlas हा AI आधारित वेब ब्राउझर आहे ज्यामुळे आपण एखादी लिंक किंवा इमेज आधी कॉपी करून मग त्याबद्दल ChatGPT ला त्यांच्या वेबसाइट/ॲपवर जाऊन मग प्रश्न विचारतो त्याऐवजी थेट ब्राऊजरसोबत जोडलेला असल्यामुळे ब्राउझरमधूनच ChatGPT मधील सोयी वापरता येतील. तुम्ही पाहत असलेली वेबसाइट अभ्यासून ChatGPT त्यावरून मदत करू शकतो.
आपण ChatGPT ला या ब्राऊजरमध्ये अमुक एखाद्या वेबसाईटवर माझ्यासाठी काही ठरविक वस्तू Cart मध्ये ॲड करून खरेदी कर असं सांगू शकतो! त्यानुसार त्या त्या प्रॉडक्ट पेजवर जाऊन आपण संगीतल्याप्रमाणे आणि आधी दिलेल्या माहितीनुसार तो आपल्यावतीने त्या वस्तूंची खरेदी पार पाडेल! आपण पाहत असलेल्या कोणत्याही वेबसाइटवरील कंटेंटचा सारांश मागू शकतो, वस्तूंची तुलना करायला सांगू शकतो किंवा डेटा असेल तर त्याचा अभ्यास करून प्रश्न विचारू शकतो! ईमेलमधील टेक्स्ट हायलाइट क्रेन, कॅलेंडरमध्ये invite तयार करणे, डॉक्युमेंटमधील काही बदल असं बरंच काही करता येतं…
अशा प्रकारच्या ब्राऊजिंगला Agent Mode किंवा Agentic Browsing म्हणतात ज्यामध्ये आपण आपल्या शब्दांत ChatGPT ला आपल्याला करायचं असलेलं काम सांगायचं त्याबद्दल एखादा प्रश्न विचारेल आणि दिलेल्या उत्तरानुसार आपल्या वतीने ChatGPT स्वतः त्या वेबसाइटवर जाऊन ती कृती करेल. सध्या ज्या गोष्टी आपल्याला ChatGPT च्या त्यांच्या वेबसाइट/ॲपवर जाऊन कराव्या लागायच्या त्या आता थेट ब्राऊजरमधूनच एका क्लिकवर बाजूला साइडबार मध्ये होताना दिसतील!
ChatGPT Atlas Download Link (Only for macOS) https://chatgpt.com/atlas

ChatGPT Atlas मधील काही खास सोयी खालीलप्रमाणे
- आपण सांगितलेल्या गोष्टीसाठी आपण उघडलेल्या सर्व टॅब्ज आणि वेबसाइट्सचा एकत्रित अभ्यास करून माहिती देऊ शकेल!
- दिलेली माहिती आणि उघडलेल्या वेबसाइट्सचा योग्य मेळ घालून गोष्टी automate करू शकेल.
- एजंट मोड (Agent Mode) ब्राउझरमध्ये तुमचं काम थेट ChatGPT ला द्यायचं झालं तर Agent Mode मदत करेल उदाहरणार्थ, तुम्हाला एखादी पार्टी आयोजित करायची असेल तर ChatGPT Atlas मध्ये अमुक अमुक वस्तू शोध, कार्टमध्ये भर आणि ऑर्डर दे किंवा एखादी फ्लाइट/हॉटेल शोधून बुक कर अशी कामं ते ऑनलाइन स्वतः करून देऊ शकतो.
- गोपनीयतेसाठी अनेक पर्याय उपलब्ध.
- ब्राउझर मेमरी अशी सुविधा आहे म्हणजे तुमचे शोध, पाहिलेले पेजेस, केलेलं काम लक्षात ठेऊन त्या माहितीचा उपयोग करून ChatGPT तुम्हाला पुढे मदत करू शकतो.
- ब्राउझर मेमरी वापरणं ही तुमची संमतीने होते. तुम्ही पाहिलेली पेजेस, सर्चचा इतिहास, हे सर्व ब्राउझरमध्ये वगळू शकता किंवा Incongnito मोडमध्ये शोधू शकता. तसेच कोणत्या साइट्सवर ChatGPT ला पाहता येईल हे तुम्ही निवडू शकता.
- AI द्वारे टॅब मॅनेजमेंट करता येईल!
Atlas ब्राऊजरसुद्धा सध्या उपलब्ध असलेल्या गूगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एज, Brave, सफारी अशा ब्राऊजर्स प्रमाणे Chromium वापरुनच तयार केलेला आहे त्यामुळे गूगल क्रोमसाठी उपलब्ध असलेल्या Extensions सारख्या सर्व सोयी यामध्येही मिळतीलच.
ChatGPT च्या Agent Mode मध्ये अजूनही काही धोके आहेत असं स्वतः OpenAI ने सांगितलं आहे. तुमच्या वतीने काम करताना साध्या चुका करण्याव्यतिरिक्त, एजंट लपलेल्या चुकीच्या सूचनांनाही बळी पडू शकतात. अशा सूचना वेबपेज किंवा ईमेलसारख्या ठिकाणी लपविल्या जाऊ शकतात, ज्यांचा उद्देश ChatGPT एजंटच्या अपेक्षित वर्तनावर नियंत्रण मिळवणे असतो. यामुळे तुम्ही लॉग इन केलेल्या साइट्समधील माहिती चोरी जाणे किंवा तुम्ही नको असलेल्या कृती केल्या जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ही अडचण Atlas, Comet अशा सर्वच Agentic Browsers मध्ये असणार आहे.
याची नव्या ब्राऊजरची घोषणा झाल्यावर त्यांची स्पर्धा ब्राऊजर विश्वात सध्याचा राजा असलेल्या गूगल क्रोमसोबत असल्यामुळे गूगलची मालकी असलेल्या Alphabet कंपनीचे शेयर्स ३.४ टक्क्यानी कोसळले आहेत (अर्थात काही वेळातच सावरलेसुद्धा) ! गूगलसुद्धा Gemini मार्फत अशा सोयी गूगल क्रोममध्ये आणत आहे आणि Perplexity ने काही दिवसांपूर्वीच Comet ब्राऊजर आणला आहे जो या नव्या ChatGPT Atlas प्रमाणेच काम करतो. आता या सगळ्यांच्या स्पर्धेत कोण जिंकतो हे पुढे समजेलच..