विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

WIndows 11 Copilot Mico Clippy

मायक्रोसॉफ्टने Copilot चा नवीन Fall Release जाहीर केला आहे, ज्यात AI सहाय्यकाला जास्त मानवी, जास्त कामात येणारा व आपल्याशी नीट संवाद साधणारा बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
याचसोबत Windows 11 वर AI अनुभवांकडे लक्ष देऊन प्रत्येक Windows 11 PC ला एक AI PC बनवणे या दृष्टिकोनातून नवीन Agentic फीचर्स जाहीर झाले आहेत. याचाच भाग म्हणून पूर्ण ओएसमधील गोष्टी करण्यासाठी आपण आता Copilot ची मदत घेऊ शकतो!

आता विंडोज आणि Copilot द्वारे एक नवा Mico नावाचा Companion मिळणार असून हा एक blob आकाराचा असिस्टंट जो आपण ज्याप्रकारे बोलत आहोत त्याचा अभ्यास करून उत्तरे देतानासुद्धा वेगवेगळे हावभाव आणि आवाजात चढउतार करून उत्तरे देईल ! विशेष म्हणजे यामध्ये गंमत म्हणून त्यांनी जुन्या विंडोजमध्ये एकेकाळी उपलब्ध असलेल्या Clippy ला सुद्धा आणलं आहे. Mico च्या डिझाईनसाठी मिळणारे वेगवेगळे पर्यायांमध्ये Clippy सुद्धा मिळेल.

Copilot Vision सारख्या सोयीमुळे आपण शब्दशः आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारून ती अडचण Copilot कडून दूर करून घेऊ शकतो!

Copilot Fall Release मधील मुख्य वैशिष्ट्ये या अपडेटमध्ये एकूण १२ मोठ्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. त्यातील काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे:

या फीचर्समुळे कोपायलट तुम्हाला मदत करेल पण हे करताना गरजेचा असलेला डेटा आणि इतर कंट्रोल तुमच्याकडे राहतो. हे अपडेट सुरुवातीला अमेरिका, यूके, कॅनडा येथे उपलब्ध होणार असून नंतर हळूहळू इतर ठिकाणी येईल.

विंडोज ११ वर एआय आणखी सोपे: नवे कोपायलट आणि Agentic Features : या रिलीजने प्रत्येक विंडोज ११ पीसीला एआय पीसी बनवलं आहे. तुम्ही “Hey Copilot” म्हणून बोलू शकता आणि तो तुमचं बोलण ऐकायला तयार होईल.

मायक्रोसॉफ्ट गेल्या काही दिवसात AI च्या शर्यतीत थोडंसं मागे पडत असल्याची जाणीव होताच भसाभस AI फीचर्स आणत आहे पण या सोयी उपयुक्त असल्या तरी एकाचवेळी अनेक नव्या गोष्टी आणि त्यात व्यवस्थित माहिती देणारं UI डिझाईन नसल्याने वापरकर्त्यांना अडचणीच्याच ठरणार आहेत. Copilot एज ब्राऊजरमध्येही उघडल्यावर बऱ्याच गोष्टी स्क्रीनवर दिसू लागतात ज्यांची त्यावेळी आपल्याला गरज नसते.

हल्ली ट्रेंडनुसार सगळ्याच गोष्टी AI AI AI म्हणत प्रत्यक्ष वापर आणि युजर्सना एकंदरीत AI फीचर्सची गरज याकडेही लक्ष द्यायला हवं. AI फीचर्सच्या नादात मूळ सॉफ्टवेअर/वेबसाइटचा वापर कोणत्या गोष्टीसाठी होतो तेच बाजूला गेल्यासारखं होईल…

Exit mobile version