अडोबीने आपल्या प्रमुख क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्हिटी टूल्स Adobe Photoshop, Adobe Express आणि Adobe Acrobat यांचा ChatGPT मध्ये थेट समावेश केला आहे. या मोठ्या अपडेटमुळे ChatGPT वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरच फोटोशॉपमधील काही सोयी वापरता येणार आहेत तेसुद्धा मोफत!
या नव्या इंटिग्रेशनमुळे बेसिक फोटो एडिटिंग, डिझाईन्स आणि डॉक्युमेंट एडिटिंग ChatGPT मध्येच करता येईल.
ChatGPT मध्ये फोटोशॉप कसं वापरायचं ?
- ChatGPT वर जा त्यानंतर डाव्या कोपऱ्यात खाली तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करून Settings मध्ये जा
- आता आलेल्या स्क्रीनवर Apps & Connectors निवडा
- आता Browse Apps मधून Adobe Photoshop सिलेक्ट करा
- त्यानंतर आलेल्या स्क्रीनवरील मेसेज वाचून Connect वर क्लिक करा.
- आता तुम्ही जिथे ChatGPT सोबत चॅट करता तिथे खाली असलेल्या + वर क्लिक करून More > Adobe Photoshop सिलेक्ट करा
- आता तुम्हाला एडिट करायची असेल ती फाइल अपलोड करा आणि तुम्हाला हवा असलेला बदल ChatGPT ला सांगा.

Photoshop आता ChatGPT मध्ये फोटोशॉपच्या मदतीने आता तुम्ही:
- विशिष्ट फोटो भाग सुधारू शकता
- ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, एक्सपोजर बदलू शकता
- इफेक्ट्स लावू शकता
- बॅकग्राऊंड काढून टाकू शकता.
- याचं सर्व नियंत्रण स्लायडर्ससहित ChatGPT मध्ये मिळते, ज्यामुळे एडिटिंग सोपं होईल.
ChatGPT मध्ये फोटोशॉपसाठी उपलब्ध prompts
- Blur background.
- Make my image look creative with effects
- Remove background
- Make colors more vibrant
- Pop subject
- Apply an effect or adjustment to the background
- Apply an effect or adjustment to a specific part of the image
या नवीन Adobe टूल्स सर्व ChatGPT वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. Photoshop, Adobe Express आणि Acrobat ChatGPT च्या: डेस्कटॉप, वेब, iOS वर उपलब्ध आहेत. Android साठी तूर्तास फक्त Adobe Express चाच सपोर्ट आहे. Photoshop व Acrobat लवकरच Android च्या ChatGPT ॲपवर येत आहेत.
अर्थात हे पूर्ण फोटोशॉप सॉफ्टवेअर नाही. अगदी मर्यादित सोयी याद्वारे देण्यात आल्या आहेत. शिवाय आपल्याला आणखी पर्याय हवे असतील तर Adobe Photoshop Web कडे जा असा मेसेजसुद्धा दिसतो. थोडक्यात छोटं एडिटिंग व इफेक्टस् असतील तर ते याद्वारे करता येईल. त्यापेक्षा आणखी पर्याय हवे असतील तर फॉटोशॉप वेब वर जा आणि त्यापेक्षाही आणखी सोयी हव्या असतील तर नेहमीचं फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरा.
अधिक माहितीसाठी संदर्भ : https://blog.adobe.com/en/publish/2025/12/10/edit-photoshop-chatgpt