OpenAI ने भारतासाठी खास स्वस्त ChatGPT Go हा सबस्क्रिप्शन प्लॅन सुरू केला आहे. या नव्या प्लॅनची किंमत ३९९ इतकीच असणार आहे. यासोबतच भारतीय युजर्सना आता ChatGPT च्या सगळ्या सबस्क्रिप्शनचे पेमेंट भारतीय रुपयांत UPI द्वारे करता येणार आहे.
- ChatGPT Go किंमत: फक्त ₹399 प्रति महिना, हे ChatGPT Plus (₹1,999) व Pro (₹19,900) च्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.
- या नवीन प्लॅनमध्ये युजर्सना फ्री व्हर्जनच्या तुलनेत दहा पट मेसेज व इमेज जनरेशन आणि दुप्पट मेमरी मिळते.
- UPI द्वारे थेट पेमेंटचा पर्याय, ज्यामुळे क्रेडिट/डेबिट कार्डशिवाय सबस्क्रिप्शन खरेदी शक्य.
- सगळ्या प्लॅन्सच्या किंमती आता रुपयात दिसतील.
या प्लॅनमध्ये काय मिळणार?
- Extended access to GPT-5: Enjoy more usage of our flagship model.
- Extended access to image generation: Create more images for work or play.
- Extended access to file uploads: Analyze and work with more documents, spreadsheets, and other files.
- Extended access to advanced data analysis: Use tools like Python for data exploration and problem-solving more often.
- Longer memory for more personalized responses: Keep conversations flowing with a larger context window.
- Access to projects, tasks, and custom GPTs: Organize your work, track progress, and build personalized AI tools with more flexibility.
नवा प्लॅन कोणासाठी उपयुक्त?
- विद्यार्थी, फ्रीलान्सर, वेब डेव्हलपर, ग्राफीक डिझायनर, AI वापरकर्ते, ज्यांना अधिक क्षमतांची गरज आहे पण प्रीमियम प्लॅन नको.
- या प्लॅनमुळे ज्यांचा नॉर्मल युजर्सपेक्षा जास्त पण प्रो युजर्सपेक्षा कमी वापर आहे त्यांना नक्कीच फायदा होईल.
- भारतातील मोठ्या युजर बेस मिळवण्यासाठी OpenAI ने हा प्लॅन प्रथम भारतात आणला असून पुढे तो जगभर मिळणार आहे.
या प्लॅनबद्दल अधिक माहिती : https://help.openai.com/en/articles/11989085-what-is-chatgpt-go
OpenAI काही दिवसांपूर्वीच ChatGPT मध्ये GPT 5 आणलं असून त्यामधील आपोआप आपल्या गरजेनुसार मॉडेल सिलेक्ट होण्याची सोय या प्लॅन्समध्येही मिळणार आहेच. GPT-5 ही OpenAI ची अत्याधुनिक भाषा मॉडेलची नवी आवृत्ती आहे, जी पूर्वीच्या GPT-4 पेक्षा अधिक बुद्धिमान, वेगवान आणि अचूक आहे. यामध्ये अधिक नैसर्गिक, सुसंगत आणि संदर्भानुसार संवाद साधण्याची क्षमता आहे. मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेसिंग, कोड जनरेशन, मल्टी-लँग्वेज सपोर्ट आणि कस्टम ट्यूनिंग करता येईल.