Tesla ने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या बहुप्रतीक्षित Next-Generation Roadster चे खास प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमात कारचा वेग, हवेत झेप घेण्याची क्षमता आणि SpaceX च्या तंत्रज्ञानावर आधारित विशेष Propulsion System यांची झलक पाहायला मिळाली. ही कोलांटी उडी म्हणजे backflip मारू शकते आणि काही सेकंदांसाठी उडूसुद्धा शकते!
Tesla Roadster 2026: जवळपास नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी झलक
Tesla च्या दुसऱ्या पिढीतील Roadster ची घोषणा नोव्हेंबर २०१७ मध्ये करण्यात आली होती. ही कार २०२० मध्ये बाजारात येण्याची अपेक्षा होती. मात्र अनेक वेळा उत्पादनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर १५ ऑक्टोबर २०२६ रोजी अमेरिकेतील टेक्सास येथे आयोजित कार्यक्रमात कंपनीने नव्या Roadster चे प्रात्यक्षिक दाखवले.
या कार्यक्रमामुळे इलेक्ट्रिक कारच्या कामगिरीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही कार केवळ वेगवान इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार नसून भविष्यातील वाहन तंत्रज्ञान दाखवण्यासाठी तयार केलेला प्रयोगही आहे.

या कार्यक्रमातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे Roadster ने केलेले हवेत झेपावण्याचे प्रात्यक्षिक. SpaceX कंपनीच्या सहकार्याने या कारमध्ये विशेष Thruster System विकसित करण्यात आले आहे.
प्रात्यक्षिकात कारने विशेष Ramp वर उलट्या दिशेने धाव घेतली आणि त्यानंतर हवेत फिरून पुन्हा खाली काही सेकंद हवेत उडत खाली उतरली. कारच्या खाली बसवलेल्या Fan-based Suction System मुळे ती विशिष्ट पृष्ठभागाला चिकटून राहू शकते. तर High-pressure Air चा वापर करणारे Thrusters कारला हवेत दिशा बदलण्यासाठी आणि नियंत्रित हालचाली करण्यासाठी मदत करतात.
मात्र, याचा अर्थ Roadster ही सामान्य वापरासाठी तयार झालेली Flying Car आहे असा नाही. हे प्रात्यक्षिक नियंत्रित परिस्थितीत करण्यात आले असून अशा तंत्रज्ञानाचा सार्वजनिक रस्त्यांवर वापर करण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि सुरक्षिततेचे नियम अद्याप स्पष्ट नाहीत.
0 ते 60 mph वेग फक्त 0.81 सेकंदांत?
Roadster च्या प्रात्यक्षिकातील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे तिचा वेग. इलॉन मस्क यांनी ही कार 0 ते 60 mph म्हणजे सुमारे ९७ किमी/तास वेग १ सेकंदापेक्षा कमी वेळेत गाठू शकते, असा दावा केला. या कारचा टॉप स्पीड 230 mph पेक्षा जास्त असेल.
महत्त्वाचे मुद्दे
- कंपनीने 0 ते 60 mph वेग 1 सेकंदापेक्षा कमी वेळेत गाठण्याचा दावा केला.
- SpaceX च्या सहकार्याने विकसित केलेल्या १० छोटे एअर थ्रस्टर्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे गाडीला अभूतपूर्व पकड (Grip) आणि वेग मिळतो.
- यामधील २ हाय प्रेशर एयर टॅंक ही कार स्वतः रीचार्ज करेल. बाहेरून प्रॉपेलंट भरण्याची गरज नाही असं सांगितलं आहे!
- Roadster चे Performance, Thrust आणि Rocket असे तीन प्रकार असतील.
- Rocket प्रकार सार्वजनिक रस्त्यांवर वापरण्यास मान्यता नसल्याचे सांगण्यात आले.
- उत्पादन 2028 मध्ये सुरू करण्याचे लक्ष्य आहे.
सोशल मीडियावर या कारमधील अनपेक्षित गोष्टींनी आश्चर्यचकित झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी शेयर केल्या आहेत तर काही जणांनी याला स्टंट संबोधून या कारच्या प्रत्यक्ष वापर क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.











