MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

CES 2024 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 13, 2024
in Events
CES 2024

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान पार पडला! सीईएस कार्यक्रम लास वेगासमध्ये भरला असून नेहमीप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये आपापली उत्पादने सादर करण्यासाठी जोरात स्पर्धा दिसून आली…यावेळी अपेक्षेप्रमाणे सर्व गोष्टीत AI जोडण्यास सुरुवात झाली आहे असं दिसून आलं. हा बराच मोठा कार्यक्रम असल्याने यामधील प्रत्येक गोष्टीबाबत सांगता येणार नाही मात्र काही प्रमुख चर्चा झालेली उपकरणांची माहिती खाली देत आहोत.

LG Signature OLED T

LG (एलजी) : एलजी खऱ्या अर्थाने CES 2024 गाजवलं असं म्हणता येईल. त्यांनी LG Signature OLED T नावाचा पारदर्शक डिस्प्ले असलेला टीव्ही सादर केला आहे. होय या टीव्हीमध्ये टीव्ही सुरू असतानाच काचे प्रमाणे टीव्हीच्या मागेसुद्धा पाहता येतं! हा ७७ इंची OLED टीव्ही असून हा नॉर्मल टीव्हीप्रमाणेसुद्धा वापरता येतो. या टीव्हीला यंदाच्या कार्यक्रमात Best Of CES 2024 असल्याचा मान मिळाला आहे! यासोबत UltraGear OLED मॉनिटर्स, एक कन्सेप्ट कार ज्यामध्ये LG Mobolity अंतर्गत त्यांच्या कार्समध्ये जोडता येणाऱ्या सोयी दाखवल्या आहेत. LG Dukebox हे ३० इंची पारदर्शक डिस्प्ले असलेलं गाणी ऐकण्यासाठी उपकरण आणि CineBeam Qube नावाचा छोटा प्रॉजेक्टरसुद्धा त्यांनी इथे सादर केला आहे!
व्हिडिओ : https://youtu.be/2BZy3OJeAbs

ADVERTISEMENT

Samsung (सॅमसंग) : सॅमसंगनेसुद्धा Transparent डिस्प्लेचं तंत्रज्ञान सादर केलं आहे. यासोबत त्यांचे Neo QLED टीव्ही, Flex Fip नावाचा दुमडता येणारा कन्सेप्ट फोन. Rollable OLED डिस्प्ले, Ballie नावाचा AI robot आणि Samsung Music Frame नावाचं स्पीकर उपकरण सादर केलं आहे. यावेळी त्यांनी AI for All या घोषवाक्याखाली त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांची स्मार्ट होम उपकरणे आणि आता लवकरच येणार Galaxy S24 सिरिज स्मार्टफोनमध्येही Galaxy AI चा समावेश असेल.

Sony Afeela with PS5 Controller

Sony (सोनी) : गेल्यावर्षी सादर झालेल्या Afeela कन्सेप्ट कारमधील नव्या सोयी यावेळी सोनीने प्रदर्शित केल्या असून यासाठी त्यांनी चक्क Playstation 5 चा कंट्रोलर वापरुन ही कार स्टेजवर चालवून दाखवली! या कारमध्ये तब्बल ४५ कॅमेरा आणि सेन्सर आहेत! शिवाय या कारमध्येच PS5 गेम्स खेळता येतात. प्रत्यक्ष उपलब्ध होणाऱ्या कारमध्ये मात्र या सर्व सोयी कदाचित नसतील.
ही कार २०२५ मध्ये बुकिंग सुरू होऊन २०२६ मध्ये उपलब्ध होईल. यासोबत नवा XR हेडसेट, कंटेंट क्रिएटर्ससाठी आभासी स्टुडिओ आणि त्यासंबंधीत टुल्सबद्दल माहिती दिली.
व्हिडिओ : https://youtu.be/GtdWs8WkWds?t=1780

Rabbit R1

Rabbit : या कंपनीने Rabbit R1 नावाचं हे छोटं AI आधारित उपकरण आणलं असून त्यांच्या म्हणण्यानुसार हे उपकरण तुमच्या फोनची जागा घेऊ शकतं. यामध्ये पर्सनल असिस्टंट सारख्या सोयी असून आपण बोलून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणं, सांगितलेल्या वेळी कॅब मागवणं, हॉटेलचं बुकिंग करणं, गाणी वाजवणं अशा गोष्टी करू शकतं. याच्या लॉंचनंतर अनेकांनी असं मत व्यक्त केलं की हे सर्व आपण आपल्या फोनमध्येही करू शकतो. यावर त्यांचं उत्तर असं आहे की यामधील ओएस अत्यंत वेगाने या सर्व क्रिया करू शकते आणि फोनमधील AI apps ना या वेगात या क्रिया करणं शक्य नाही. यासाठी त्यांनी Large Action Model चा वापर केला असून याची किंमत 200 डॉलर्स असणार आहे. विशेष म्हणजे याचं बुकिंग सुरू झालं आहे आणि दोन दिवसात २०००० जणांनी यासाठी नोंदणी केली आहे!
व्हिडिओ https://youtu.be/vp52L6UlmJY

Volkswagen : कंपनीने त्यांच्या कारमध्ये पूर्वी असलेल्या व्हॉईस असिस्टंटला आता ChatGPT ची जोड देत असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे तुम्ही कार चालवत असतानाच कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारून माहिती घेऊ शकता!

Asus Zenbook Duo 2024

Asus एसुस : एसुसने बरेच नवे लॅपटॉप्स जाहीर केले असून यामधील खास म्हणजे Zenbook Duo. या लॅपटॉपमध्ये दोन १४ इंची 3k रेजोल्यूशन आणि 16:10 aspect ratio असलेले oled डिस्प्ले आहेत! आणि विशेष म्हणजे आपल्याला हव्या त्या प्रकारे त्यांची मांडणी करता येते! याची किंमत $1499 पासून सुरू होते. याच कार्यक्रमात एसुसने त्यांच्या गेमिंग फोन मालिकेतील ASUS ROG Phone 8 आणि 8 Pro सादर केले आहेत.

Lenovo लेनेवो : या कंपनीने ThinkBook Plus Gen 5 Hybrid हा 2 in 1 लॅपटॉप आणला असून यामध्ये Windows 11 आणि Android या दोन्ही ओएस उपलब्ध आहेत.

Hyundai हयुंडाई : कंपनीने Supernal S-A2 या उडणाऱ्या इलेक्ट्रिक एयर टॅक्सीबद्दल माहिती दिली असून २०२८ पर्यंत ही प्रत्यक्षात उपलब्ध होईल.

DJI : DJI Flycart 30 हा एक वस्तु डिलिव्हरी करणार ड्रोन असून ३० किलो पर्यंतच्या जड वस्तू या ड्रोनमार्फत १६ किमी अंतरावर पाठवता येतात! सांगितलेल्या ठिकाणी गेल्यावर ड्रोनला जोडलेली वस्तू आपोआप खाली ठेऊन मग ड्रोनची दोरी detach होऊन परत ड्रोन मध्ये जाते आणि ड्रोन मूळ ठिकाणी परततो.
व्हिडिओ https://youtu.be/Hhp11I-vGHA

Tags: AsusCESCES 2024EventsHyundaiLGRabbitSamsungSony
ShareTweetSend
Previous Post

Poco X6 आणि X6 Pro सादर : किंमत १९९९९ पासून सुरू!

Next Post

मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

July 12, 2024
सॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता GalaxyAI सह!

सॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता GalaxyAI सह!

January 18, 2024
Next Post
मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech