MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स

आयफोन की अँड्रॉइड

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 30, 2012
in ऑपरेटिंग सिस्टिम्स
iphone.jpgनवीन मोबाइल घेताना नेहमी प्रश्न पडतो कोणता घ्यावा ? अँड्रॉइड की आयफोन ? त्यातही महागडा फोन घ्यायचा तर गोंधळ आणखीनच वाढतो . सॅमसंग गॅलक्सी एस ३ आणि आयफोन पैकी कशाची निवड करावी ते कळतच नाही .दोन्ही त्यांच्या ठिकाणी ग्रेट आहेत , पण मग निवड कशी करायची ? तेव्हा निवड करताना सर्वात आधी पहा ते तुमचा मोबाइल ऑपरेटर . तसेच तुमच्या गरजेच्या अॅप्स आणि इतर गोष्टी कुठे आहेत तेही पहा . कारण एकदा का खरेदी झाली की स्विच करणे आर्थिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने त्रासदायक असते 


आयफोन 


मोठ्या प्रमाणात चांगल्या अॅप्सची उपलब्धता हे आयफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे . अॅपलच्या अॅप स्टोअरवर ७ लाखाहून अधिक अॅप्स उपलब्ध आहेत . ब – याचशा प्रस्थापित कंपन्या सुरुवातीला आयफोनसाठी अॅप बनवतात नंतर अँड्रॉइडसाठी . कितीतरी काळ इन्स्टाग्राम फक्त आयफोनसाठीच उपलब्ध होतं . फेसबुकनेही त्यांचं नवीन अॅप सुरुवातीला फक्त आयफोनसाठी उपलब्ध करून दिलं नंतर अँड्रॉइडसाठी . ट्विटर आणि फेसबुकचे आयफोन अॅप अतिशय उत्तम आहेत . त्यामुळे पोस्ट टाकणं अगदीचसहज होतं . पासबुकसारखी काही आयफोनसाठीच बनविलेली अॅपही याठिकाणी आहेत . मोबाइल पेमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्क्वेअर कंपनीने त्यासाठी ही सुविधा देऊ केली आहे . याच्या सेटअपसाठी खूप वेळ लागत असला तरी फायदेही आहेतच . सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अॅपलच्या सिस्टीममध्ये उदा . की – बोर्ड बदलण्यासारखे फारसे बदल करू शकत नाहीत . त्यामुळे टेक सॅव्ही नसलेल्या किंवा ज्यांना फारसे बदल करायचे नसतील त्यांना याचा फायदा होतो . 


अँड्रॉइड 


अँड्रॉइडचा सर्वात मोठा प्लसपॉइंट म्हणजे विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले मोबाइल्स . सँमसंग , एलजी ,मायक्रोमॅक्सपासून कितीतरी कंपन्यांचे अँड्रॉइड फोन बाजारात उपलब्ध आहेत . अगदी गुगलचा नेक्ससही तुमच्यासाठी हजर आहे . अँड्रॉइडचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे , तुम्हाला गरजेप्रमाणे यात बदल करता येतात . उदा . स्विफ्ट की हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले एक आघाडीचे अॅप आहे . यात तुम्ही गरजेप्रमाणे की- बोर्ड बदलू शकता किंवा तुम्ही कोणता शब्द टाइप करणार याचा अंदाज हे सॉफ्टवेअर व्यक्त करते . त्यातून टायपिंग जलद होऊ शकते . आणखी एक गोष्ट म्हणजे याठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या अॅप्स .अॅपल अॅप्स ही डेव्हलपरची पहिली पसंत असली तरी कित्येक अॅप्सला अॅपल मंजुरीच देत नाही . गुगलचं तसं नाही . त्यामुळे गुगलवरही जवळपास ७ लाख अॅप्स आहेत . विंडोज फोन आणि ब्लॅकबेरी हे देखील काही पर्याय आहेत . पण त्यांना अँड्रॉइड किंवा आयफोन इतक्या अॅप्सपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल .
ADVERTISEMENT
Tags: AndroidiPhoneWindows
ShareTweetSend
Previous Post

भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम

Next Post

या आहेत मराठीटेकवरच्या 2012 9च्या टॉप 9 नोंदी (Posts)

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Apple iPhone 16 Series

ॲपलचे iPhone 16, 16 Pro, Watch Series 10, AirPods 4 सादर!

September 10, 2024
Crowdstrike BSOD Windows

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

July 19, 2024
Next Post
या आहेत मराठीटेकवरच्या 2012 9च्या टॉप 9 नोंदी (Posts)

या आहेत मराठीटेकवरच्या 2012 9च्या टॉप 9 नोंदी (Posts)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech