Sooraj Bagal

Sooraj Bagal

मायक्रोमॅक्स फोरची घोषणा Micromax lauches flagship model one the top 10 mobiles Canvas 4

अनेक परदेश ब्रॅम्डच्या तोडीस तोड फोन उपलब्ध करुन अल्पावधीत नावारुपाला आलेल्या मायक्रोमॅक्स कंपनीने अखेर आपल्या कॅनव्हास-४ या बहुप्रतीक्षित मोबाईल फोनच्या...

‘स्माइली’ संवाद Top 10 smileys for facebook

चॅटिंग करताना व्यक्ती प्रत्यक्ष समोर नसल्यामुळे बोलण्यातला नेमका सूर काय आहे , हे समोरच्यापर्यंत नेमकेपणानं पोहोचवण्यासाठी तरुणांकडून विविध कॅरेक्टर्स वापरली जातात. या...

एमएसऑफिस आयफोनवर

तंत्रज्ञानाचे जाळे जसजसे वाढत जाईल , तसे कम्प्युटर , लॅपटॉप , टॅब्लेट , स्मार्टफोन हे सगळे एकाच माळेतले वेगवेगळ्या आकारातील मणी वाटतील, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही . टीव्ही ,कम्प्युटर , इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमधील पायऱ्याच आहेत . स्मार्टफोनवर इंटरनेट पाहता येईल, सर्च करता येईल , असे कुणालाही वाटले नव्हते ; पण तसे झाले . आता आणखी एक वरची पायरी या क्षेत्रात येऊ घातलीय . ती म्हणजे ' अॅपल ' च्या आयफोनवर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची सॉफ्टवेअर वापरता येणार आहेत . वर्ड , एक्सेल , पॉवरपॉइंट आयफोनवरही वापरता येणार आहे . वेगवेगळी सॉफ्टवेअर स्मार्टफोनवर वापरता येतील , याकडेच तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू आहे .  आयफोनवरील सॉफ्टवेअरच्या वापरासाठी कंपनी कुठलेही नवे व्हर्जन तयार करणार नाही ; तसेच अॅन्ड्रॉइड व्हर्जनसाठी वेगळी ' अॅप ' बनवणार नाही . ' मायक्रोसॉफ्ट ' ची विंडोज सिस्टीम असणाऱ्या टॅब्लेट कम्प्युटरवर ही सॉफ्टवेअर्स वापरता येणार आहेत . मोबाइलसाठी बनवण्यात आलेला ' ऑफिसमोबाइल ' चा सूट अॅपलच्या ' अॅप ' स्टोअरमध्ये ' फ्री ' उपलब्ध आहे ; मात्र त्यासाठी दर वर्षाला 'ऑफिस ३६५ ' विकत घ्यावे लागणार आहे . ' ऑफिस ३६५ ' असेल , तर मॅक असलेल्या कम्प्युटरवर आणि विंडोज कम्प्युटरवर ते वापरता येईल . ' ऑफिस ' चे पॅकेज असेल , तर वेगवेगळ्या कम्प्युटरवर ते चालवता येईल ; तसेच त्याचे अपडेटही मिळतील . कम्प्युटरवरच्या फाइल आयफोनवर ओपन करता येतील . केवळ ' हेवी वर्क ' त्यामध्ये करता येणार नाही . मोठे ग्राफिक , एखादा मोठा प्रबंध आणि त्याचे पूर्ण डिझाइन करायचे असेल , तर कम्प्युटरशिवाय पर्याय नाही ; मात्र छोट्या कामांसाठी ' आयफोन ' वापरता येईल . मेल करणे ,फाइलमध्ये छोटासा बदल करणे , काही शब्द वाढवणे , काढणे , प्रेझेंटेशन सादर करण्यासारख्या गोष्टी आयफोनवरील ' ऑफिस सॉफ्टवेअर ' मध्ये करता येतील . कम्प्युटरवरील फाइल आयफोनवर ऑटोमेटिक रिसाइज होतील . आयफोन अॅपमुळे कम्प्युटरवर तयार करण्यात आलेले चार्ट ,अॅनिमेशन आणि इतर माहितीमध्ये काहीही बदल होणार नाही . अमेरिका सोडून इतर देशांत लवकरच हे प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहे . एकंदरीतच कम्प्युटरचा आकार स्मार्टफोनपर्यंत लहान होत चाललाय , असे म्हटले , तर ते चुकीचेठरणार नाही . कम्प्युटरवरील सगळी अॅप्लिकेशन आता हळूहळू स्मार्टफोनवरही करता येत आहेत .इंटरनेट , ऑफिस सॉफ्टवेअर , गाणी ऐकणे , व्हिडिओ यांसारख्या फॅसिलिटी स्मार्टफोनवरही आहेत .फरक आहे , तो केवळ काम करण्याच्या क्षमतेचा . हा फरकही आगामी काळात पुसट होत जाऊन 'युनिव्हर्सल पॅकेज ' असलेले एकच डिव्हाइस बाजारात येईल , अशी कल्पना करायला तूर्तास तरी हरकत नाही ! 

मेसेंजर आपला आपला

स्मार्ट फोनमुळे मेसेंजरपासून ते जीटॉकपर्यंत सर्व काही आपल्या हातात आले आहे. बरेच पर्याय उपलब्ध असल्यामुळे नेमके काय आणि कशा प्रकारे...

Page 265 of 318 1 264 265 266 318
ADVERTISEMENT
error: Content is protected!