MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

मायक्रोमॅक्‍सचा कॅनव्‍हास डुडल2 स्‍मार्टफोन लॉंच, सॅमसंगला देणार टक्‍कर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 3, 2013
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
मायक्रोमॅक्‍सचा कॅनव्‍हास डुडल2 स्‍मार्टफोन लॉंच, सॅमसंगला देणार टक्‍करस्‍मार्टफोन्‍सच्‍या स्‍पर्धेत मायक्रोमॅक्‍सने एक ऍडव्‍हान्‍स स्‍पेसिफिकेशन असलेला फॅबलेट लॉंच केला आहे. कोणताही गाजावाजा न करता कंपनीने हा स्‍मार्टफोन लॉंच केला. काही दिवसांपासून या स्‍मार्टफोनची इंटरनेटवर बरीच चर्चा होती. अखेर तो अधिकृतरित्‍या लॉंच झाला आहे. हा स्‍मार्टफोन आहे मायक्रोमॅक्‍स कॅनव्‍हास डूडल2 (ए240). स्‍पेसिफिकेशन्‍स आणि फिचर्सवर नजर टाकल्‍यास हा फोन सॅमसंग आणि सोनी यासारख्‍या कंपन्‍यांच्‍या फोन्‍सला निश्चितच टक्‍कर देईल अशी चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच मायक्रोमॅक्‍सने कॅनव्‍हास4 स्‍मार्टफोन सादर केला होता. त्‍यानंतर हा एक महत्त्वाकांक्षी फोन कंपनीने बाजारात आणला आहे.
या फोनचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे, 5.7 इंचाच्‍या स्‍क्रीनमुळे स्‍मार्टफोन आणि टॅबलेटचा सुवर्णमध्‍य त्‍यात साधला गेला आहे. मायक्रोमॅक्‍सचा हा सर्वात मोठा स्‍मार्टफोन आहे. त्‍यामुळे गॅजेटप्रेमींमध्‍ये फोनबद्दल उत्‍सुकता आहे.
‘Can your imagination get bigger?’ अशा टॅगलाईनने फेसबुक फॅनपेजवर प्रमोशन सुरु केले होते. या टॅगलाईनने गॅजेटप्रेमींना आकर्षित करण्‍याचा हा प्रयत्‍न होता. स्‍क्रीनचा आकार माहिती झाल्‍यानंतर स्‍पष्‍ट झाले, की हा मायक्रोमॅक्‍सचा सर्वात मोठा स्‍मार्टफोन आहे.फोनमध्‍ये 1.2 GHz क्‍वाडकोर प्रोसेसर आहे. तसेच 1280×720 स्‍क्रीन रिझॉल्‍यूशन आहे. कॅनव्‍हास4 आणि कॅनव्‍हास एचडीमध्‍येही एवढेच स्‍क्रीन रिझॉल्‍यूशन आहे.फोनमध्‍ये 12 मेगापिक्‍सेलचा मुख्‍य कॅमेरा आहे. समोरून 5 मेगापिक्‍सेलचा कॅमेरा देण्‍यात आला आहे. याशिवाय ड्युअल एलईडी फ्लॅशही देण्‍यात आला आहे.ऍण्‍ड्रॉईड 4.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्‍टीमने फोन सज्‍ज आहे. ही एक दमदार ऑपरेटींग सिस्‍टीम असून चांगला परफॉर्मन्‍स देते.हा फोन ख-या अर्थाने पॉवरफुल आहे. फोनमध्‍ये 2600 mAh क्षमतेची बॅटरी आहे. याशिवाय 1 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरीने फोन सज्‍ज आहे. त्‍यामुळे एचडी आणि 3डी गेम्स कोणत्‍याही अडथळ्याविना खेळता येतील. गेम्‍सच्‍या चाहत्‍यांसाठी हा फोन एक पर्वणीच आहे. कारण मोठी स्‍क्रीन आणि उत्‍कृष्‍ट रिझॉल्‍यूशनमुळे गेम्‍स खेळताना परिपूर्ण आनंद मिळेल. याशिवाय हा फोन 3जी आहे. त्‍यामुळे वेगवान इंटरनेटचाही वापर करणे शक्‍य आहे. 3जी वर 42 एमबीपीएस गतीने डाऊनलोडींग करणे शक्‍य आहे.

Tags: CanvasMicromax
ShareTweetSend
Previous Post

वायरलेस चार्जिंगचा नोकिया स्मार्टफोन लाँच

Next Post

‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

in By Micromax

मायक्रोमॅक्सचे नवे फोन्स सादर : भारतीय स्मार्टफोन बाजारात पुनरागमन!

November 3, 2020
मायक्रोमॅक्सचं भारतीय स्मार्टफोन बाजारात लवकरच पुनरागमन!

मायक्रोमॅक्सचं भारतीय स्मार्टफोन बाजारात लवकरच पुनरागमन!

June 19, 2020
Huawei Micromax Deal

मायक्रोमॅक्स भारतात आता हुवावेचेही फोन्स विकणार!

July 26, 2019
मायक्रोमॅक्स Infinity N11, N12 सादर : नॉच असलेले फोन्स!

मायक्रोमॅक्स Infinity N11, N12 सादर : नॉच असलेले फोन्स!

December 19, 2018
Next Post

‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Amazon Prime Day India

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

July 22, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!