MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home सॉफ्टवेअर्स

५ उत्कृष्ट व्हिडीओ कन्व्हर्टर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 10, 2013
in सॉफ्टवेअर्स

अगदी साध्या हँडसेटवरही व्हिडीओ प्लेयर आल्याने मोबाइलवर संपूर्ण चित्रपट पाहणाऱ्यांचीही संख्याही  भरपूर. एकीकडे घरातल्या टीव्हीची स्क्रीन साइज वाढत असताना मोबाइलवर चित्रपट पाहणारेही वाढत  आहेत .  प्रामुख्याने नोकरीसाठी खूप मोठा प्रवास करावे लागणारे , काहीकामानिमित्त एकटे राहणाऱ्यांची संख्या  यामध्ये जास्त आहे. मात्र सध्याच्या काळात व्हिडीओचे विविध प्रकार उपलब्ध झाल्याने प्रत्येक फॉरमॅट  तुमच्या व्हिडीओ प्लेयरमध्ये प्ले होईलच असे नाही . त्यासाठी ही काही व्हिडीओ कन्व्हर्टर …


एमपीईजी स्ट्रीमक्लिप 


विंडोज आणि मॅकसाठी उपलब्ध असलेला एक चांगलाव्हिडीओ प्लेयर , एडिटर आणि कन्व्हर्टर आहे . यामध्ये सर्व फॉरमॅट मधल्या फाइल प्ले तर होतातच पण मोफत उपलब्ध असलेल्या या सॉफ्टवेअरमधील कन्व्हर्ट  करण्याचा स्पीडही चांगला आहे . व्हिडीओ कन्व्हर्जनसाठी उपलब्ध असलेले हे अॅप नवे नसले तरी यात अगदी सहज ,सोप्या पद्धतीने , कुठल्याही तक्रारी शिवाय व्हिडीओ कन्व्हर्ट करता येतो . 


फॉरमॅट फॅक्टरी 


भरपूर फीचर्स उपलब्ध असलेला व्हिडीओ फॉरमॅटिंगचा मोफत उपलब्ध असलेला हा आणखी एक पर्याय आहे .याचा इंटरफेस थोडा गोंधळात टाकणारा असला तरी यामध्ये कन्व्हर्जनचे शेकडो पर्याय मिळतात आणि कन्व्हर्टझालेले सर्व व्हिडीओ एकसारखेच वाटतात . यामध्ये खराब झालेला ऑडिओ – व्हिडीओ दुरूस्त करण्याचीही सोयआहे . स्वतंत्रपणे मोबाइलसाठी किंवा डीव्हीडीसाठीही व्हिडीओ कन्व्हर्ट करण्याचा पर्याय यात आधीपासूनचउपलब्ध आहे . 


हँडब्रेक 


हँडब्रेकचे मूळ कामच व्हिडीओ कन्व्हर्जन आणि ट्रान्सकोडिंग आहे . याव्यतिरिक्तही अनेक ऑप्शन्स यामध्येउपलब्ध आहेत . पण यावर कन्व्हर्ट केलेला व्हिडीओ कुठलीही स्क्रीन , कुठल्याही डिव्हाइसवर सहज प्ले होतो .विंडोज , ओएस आणि लिनक्स अशा तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले हे एक मोफत सॉफ्टवेअर आहे . 


फ्रीमेक व्हिडीओ कन्व्हर्टर 


नावाप्रमाणे मोफत असलेल्या या कन्व्हर्टरमध्ये अनेक आकर्षक ऑप्शन अंतर्भूत आहेत . २००हून अधिक व्हिडीओफॉरमॅटला सपोर्ट करणारा हा कन्व्हर्टर तुम्हाला माहिती असलेल्या जवळपास सर्व फॉरमॅटचे व्हिडीओ कन्व्हर्टकरतो . अगदी ऑनलाइन व्हिडीओ एमपी३मध्येही . यामध्ये आयओएस , अँड्रॉइड डिव्हाइस , टॅबलेट्स , गेमकन्सोल आणि इतर अनेक डिव्हाइससाठी सुरुवातीपासूनच सेटिंग्ज देण्यात आल्या आहेत . त्या नको असतील तरस्वतःही सेटिंग्ज तुम्ही निर्माण करू शकतात . 


सुपर 


सुपर हा एक चांगला व्हिडीओ कन्व्हर्टर असला तरी त्याला असलेल्या रेटिंग तितक्याशा चांगल्या नाहीत . पणएकदा का वापरण्याची सवय झाली की मग दुसरा कुठला कन्व्हर्टर वापरण्याची इच्छा होणार नाही . यामध्येउपलब्ध असलेल्या फिचर्सची यादी पानभर असली तरी यात इतक्या प्रकारचे व्हिडीओ कन्व्हर्ट होऊ शकतात कीअतिरिक्त फिचर्सची गरज पडणार नाही . तुम्हाला तुमचा व्हिडीओ पूर्ण नियंत्रणात हवा असेल तर यासारखामोफत कन्व्हर्टर नाही . 

ADVERTISEMENT
Tags: SoftwaresVideos
ShareTweetSend
Previous Post

‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट!

Next Post

अ‍ॅपलने लाँच केला सर्वात स्वस्त iPhone आयफोन ५ एस आयफोन-5सी

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
Adobe Photoshop Web

अडोबी फॉटोशॉप आता वेबसाइटद्वारे ब्राऊजरमध्येच वापरा!

October 27, 2021
SSD द्वारे जुन्या लॅपटॉपला बनवा सुपरफास्ट!

SSD द्वारे जुन्या लॅपटॉपला बनवा सुपरफास्ट!

September 18, 2021
Google Chrome Tab Groups

गूगल क्रोममध्ये टॅब ग्रुपिंग उपलब्ध : अनेक टॅब्ज एकत्र करता येणार!

February 5, 2021
Next Post
अ‍ॅपलने लाँच केला सर्वात स्वस्त iPhone आयफोन ५ एस आयफोन-5सी

अ‍ॅपलने लाँच केला सर्वात स्वस्त iPhone आयफोन ५ एस आयफोन-5सी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!